लग्नापूर्वी HIV टेस्ट करणं होणार बंधनकारक ?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 जुलै 2019

एचआयव्ही ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय. एचआयव्हीनं अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं आपण पाहिलंय. काहींची यात चूक नसते. अनेकदा लग्नानंतर आपली फसवणूक झाल्याचं पार्टनरपैकी एकाच्या लक्षात येतं. पण तोपर्यंत खूप वेळ झालेला असतो. त्यामुळंच लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट करणं गरजेचं होत चाललंय. 

संपुर्ण देशभरात ही टेस्ट लग्नाआधी करणं बंधनकारक करणं गरजेचं झालंय. कारण लग्नानंतर जेव्हा ही गोष्ट लक्षात येते तेव्हा अख्ख्या आयुष्याची माती झालेली असते. आणि समोर पर्याय काहीच नसतो. पण यात सगळ्यात आधी गोवा सरकार हा महत्त्वाचा निर्णय घेणाराय. यासंदर्भातलं एक विधेयक लवकरच गोवा विधानसभेत सादर केलं जाईल. कारण गोव्यात येणाऱ्या परदेशी नागरिकांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळं गोव्यात देहव्यापाराचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळंच एचआयव्हीचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्यानं लग्नापूर्वी एचआयव्हीची चाचणी करणं बंधनकारक करण्याच्या विचारात आहे.

दरम्यान, थॅलेसेमियाची चाचणीही करणं बंधनकारक करण्याच्या विचारात गोवा सरकार आहे. लग्नाआधी एचआयव्ही टेस्टचा गोवा सरकारचा निर्णय संपुर्ण देशभरात बंधनकारक करावा अशी मागणी जोर धरतेय.

संबंधित बातम्या

Saam TV Live