#Holi2020 : या होळीत 'अशी' घ्या लहानग्यांची काळजी...

#Holi2020 : या होळीत 'अशी' घ्या लहानग्यांची काळजी...

मुंबई: होळी म्हंटलं की आपल्यासमोर येतात निरनिराळ्या प्रकारचे रंग, पिचकाऱ्या , मजा-मस्ती आणि पुरणाची पोळी. लहान मुलांना सर्वात जास्त आवडणारा सण म्हणजे होळी. होळी येताच संपूर्ण वातावरणच बदलतं. मात्र होळी साजरी करत असताना आपल्या लहानग्यांची काळजी घयायला विसरू नका. कारण रंग, पिचकाऱ्या, पाणी यामध्ये खेळल्याने तुमच्या लहानग्यांना आजाराचा सामना करावा लागू शकतो. म्हणून जरा काळजी घ्या. तुम्ही तुमच्या लहान मुलांची काळजी कशी घेऊ शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

बाजारात रासायनिक पदार्थ वापरुन तयार करण्यात आलेले रंग मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. लहान मुलांनी हे रंग वापरल्यामुळे त्यांना त्वचेचे रोग होऊ शकतात किंवा त्यांच्या डोळ्यात अशा प्रकारचे रंग गेल्यामुळे त्यांचे डोळे खराब होऊ शकतात. होळी खेळताना लहान मुलांना दुखापतही होऊ शकते. यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना होळी खेळू देत नाहीत. मात्र आता पालकांना घाबरून जाण्याचं कारण नाही. पुढे दिलेले उपाय करून होळी खेळताना तुम्ही तुमच्या लहान मुलांची काळजी घेऊ शकणार आहात.   

(१) लहान मुलांवर लक्ष ठेवा:

लहान मुलं होळी खेळताना मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करतात. पाणी साठवण्यासाठी ड्रम किंवा पाण्याच्या टाकीचा वापर करण्यात येतो. मात्र होळी खेळताना लहान मुलं या ड्रममध्ये किंवा टाकीमध्ये पडू शकतात. त्यामुळे तुमची लहान मुलं होळी खेळत असताना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवा. त्यांच्यासोबत रहा आणि त्यांना एकटं सोडू नका. त्यांना होळी खेळण्यासाठी मज्जाव करू नका, मात्र त्यांच्यावर लक्ष ठेवा. 

(२) पिचकारीचा वापर सांभाळून करा: 

होळी आली की बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या  पिचकाऱ्या उपलब्ध असतात. पिचकारी बनवण्यात मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचा वापर केला जातो. त्यामुळे या पिचकाऱ्या जड होतात. होळी खेळताना लहान मुलांना या पिचकारीमुळे ईजा होऊ शकते. त्यामुळे होळी खेळताना लहान मुलं पिचकारीचा वापर सांभाळून करतील याची खरबरदारी घ्या. 

(३) ईको-फ्रेंडली रंगांचा वापर करा: 

रासायनिक पदार्थ वापरुन तयार करण्यात आलेल्या रंगांची बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. हे रंग वापरल्यामुळे लहान मुलांना त्वचेचे आजार होऊ शकतात. त्यांच्या डोळ्यात रंग गेल्यामुळे डोळे खराब होऊ शकतात. त्यामुळे घरीच हळद, चंदन आणि मेहंदीचा उपयोग करून तुम्ही रंग तयार करू शकता. हे रंग वापरल्यामुळे मुलांना कोणतंही नुकसान होणार नाही. 

(४) पाण्याचे फुगे वापरू नका:
 
होळीत रंगांसोबत पाण्याचे फुगेही मोठ्या प्रमाणावर लहान मुलांकडून वापरले जातात. मात्र हे फुगे एकमेकांना मारल्यामुळे लहान मुलांना गंभीर दुखापत होऊ शकते. डोळे, नाक आणि कान यांना फुगे लागल्यामुळे दुखापत होऊ शकते. त्यामुळे मुलांना पाण्याचे फुगे वापरू देऊ नका. 

(५) मुलांना योग्य प्रकारचे कपडे द्या: 

होळीमध्ये लहान मुलं मोठ्या प्रमाणावर रंग खेळतात. त्यांना या रंगांमुळे त्वचेचे रोग होऊ शकतात. लहान मुलांना पूर्ण कव्हर करतील असे कपडे त्यांना घालून द्या. ज्यामुळे त्यांच्या शरीराला रंग लागणार नाही. 

(६) मुलांना घराच्या एकटं बाहेर पाठवू नका:
 
लहान मुलांना आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत होळी खेळायला आवडतं. अनेकदा लहान मुलं त्यांच्या मित्रांच्या घरी होळी खेळायला जाण्याचा हट्ट करतात. मात्र त्यांना एकटं बाहेर पाठवू नका. तुम्ही त्यांना स्वत: बाहेर घेऊन जा. त्यांची योग्य ती काळजी घ्या. 

अशा प्रकारचे काही उपाय करून तुम्ही तुमच्या लहान मुलांची होळी खेळताना काळजी घेऊ शकता. त्यामुळे आता हे  उपाय करा आणि तुमच्या मुलांना होळी खेळण्यापासून थांबवू नका.  

Web Title: marathi news This Holi take Care of the children in this way.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com