गृह कर्जदारांसाठी आता एक खूशखबर; गृहकर्जदारांचे हप्ते होणार कमी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

गृह कर्जदारांसाठी आता एक खूशखबर आहे. ज्यांनी एप्रिल 2016 पूर्वी गृहकर्ज घेतलीयत, त्यांचं व्याज काही अंशी कमी होणारंय. त्यामुळे जुन्या गृहकर्जदारांचे हप्ते कमी होणारंयत. रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या पतधोरण आढाव्यात, त्या संबंधीच्या सूचना बँकांना दिल्यात. आधारदर प्रणाली रद्द करून एमसीएलआर दर प्रणाली लागू करण्यात टाळाटाळ करत असल्याबद्दल रिजर्व बँकेनं संबंधित बँकांना फटकारलंय. सर्व कर्जांसाठी बँकांनी आधार दर काढून टाकून त्याऐवजी एमसीएलआर दर लागू करावा, असा आदेश रिझर्व्ह बँकेनं दिलाय. याचा परिणाम म्हणून जुन्या गृहकर्जदारांचं कर्ज स्वस्त होणारंय.

गृह कर्जदारांसाठी आता एक खूशखबर आहे. ज्यांनी एप्रिल 2016 पूर्वी गृहकर्ज घेतलीयत, त्यांचं व्याज काही अंशी कमी होणारंय. त्यामुळे जुन्या गृहकर्जदारांचे हप्ते कमी होणारंयत. रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या पतधोरण आढाव्यात, त्या संबंधीच्या सूचना बँकांना दिल्यात. आधारदर प्रणाली रद्द करून एमसीएलआर दर प्रणाली लागू करण्यात टाळाटाळ करत असल्याबद्दल रिजर्व बँकेनं संबंधित बँकांना फटकारलंय. सर्व कर्जांसाठी बँकांनी आधार दर काढून टाकून त्याऐवजी एमसीएलआर दर लागू करावा, असा आदेश रिझर्व्ह बँकेनं दिलाय. याचा परिणाम म्हणून जुन्या गृहकर्जदारांचं कर्ज स्वस्त होणारंय. यामुळे या कर्जांचे व्याजदर काही अंशी खाली येण्याची शक्यता आहे. याखेरीज, कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तसंस्थांनाही रिझर्व्ह बँकेनं आपल्या नियंत्रणात आणलंय. यामुळे कर्जदारांना आपल्या तक्रारींचं निवारण करण्यास मदत होणार आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live