मुंबईत घर हवंय? मग हे वाचा, आता नो टेन्शन!

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 11 डिसेंबर 2019

मुंबईत तुम्ही स्वत:च्या हक्काचं घर शोधत असाल तर तुम्हाला आता नक्की दिलासा मिळणार आहे. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणार्‍यांसाठी 2020 हे वर्ष दिलासा देणारे ठरणार आहे. कारण मुंबईतील घरांचे दर १ टक्क्यानं कमी होती, असं सर्वेक्षण समोर आलंय. त्यामुळे 2019 मध्ये स्थिर राहिलेल्या बांधकाम क्षेत्राला पुढील वर्षी तेजी येण्याची शक्यता आहे. 

मुंबईच्या महागड्या भागातील घरांचे दर 2020 मध्ये कमी होण्याची शक्यता आहे. किमान 1 टक्क्यांनी घरांचे दर कमी होतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे 2019मध्ये स्थिर राहिलेल्या बांधकाम क्षेत्राला पुढच्या वर्षी तेजी येण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या 2 लाख 21 हजार घरं विक्रीविना पडून आहेत. तरीही त्यांचे दर कमी झालेले नाहीत. मात्र आता मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी 2020 हे वर्ष दिलासा देणारं ठरणारे. पुढील वर्षी घरांचे दर कमी होणार असले तरी मोक्याच्या ठिकाणची घरं सहजासहजी विकली जाणार नाहीत. तिथे मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाबतीत थोडी घसरण झालेली आढळेल..तसंच महागडी घरंही पडून राहतील असं एका सर्वेक्षणात समोर आलंय.

मुंबईत सद्य स्थितीत 2.21 लाख घरे विक्रीविना पडून आहेत तरीही त्यांचे दर कमी झालेले नाहीत. मुंबईत मोक्याच्या ठिकाणचे दर 12.7 टक्क्यांनी वाढलेत. 2019 च्या तिसर्‍या तिमाहीत जागतिक बाजारपेठेचा विचार करता मुंबई 28 वी सर्वात जलदगतीने विस्तारणारी बाजारपेठ म्हणून गणली गेलीय. 

घरांच्या बाबतीत मुंबई हे देशातील सर्वात महागडं शहर आहे. दहा वर्षात मुंबईतील घरांचे दर सतत चढेच राहिलेत. या वर्षात देशातील कोणत्याही शहरातील निवासी जागेला इतकी किंमत मिळालेली नाही. मुंबईत निवासी जागेचा सर्वाधिक दर 64 हजार 775 प्रति चौरस फूट इतका राहिलाय. मात्र आता मुंबईतल्या घरांचे दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत हक्काचं घर असण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न आवाक्यात येणार आहे.

Web Title - home prises will be decreased in 2020

संबंधित बातम्या

Saam TV Live