जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 15 नोव्हेंबर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019


पंचांग 15 नोव्हेंबर 2019 
शुक्रवार : कार्तिक कृष्ण 3, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.44, सूर्यास्त 5.56, चंद्रोदय रात्री 8.19, चंद्रास्त सकाळी 9.03, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर कार्तिक 24, शके 1941. 
 

मेष : मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्‍यता आहे. शासकीय कामात यश लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

वृषभ : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य चांगले राहणार आहे. संततिसौख्य सामान्य राहणार आहे. 

मिथुन : तुमचे निर्णय व अंदाज योग्य ठरतील. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. नवीन परिचय होतील. 

कर्क : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात यश लाभेल. 

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. 

कन्या : बाजारपेठेचा अभ्यास करून शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. 

तूूळ : तुमच्या वैचारिक जीवनामध्ये अनुकूल प्रगती होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

वृश्‍चिक : एखाद्या विषयासंदर्भात मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्‍यता आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. प्रवासात वस्तू हरविण्याची शक्‍यता आहे. 

धनू : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. 

मकर : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. 

कुंभ : प्रगती वेगाने होणार आहे. अपेक्षेपेक्षा सर्व क्षेत्रात यश अधिक मिळेल. व्यवसाय वाढेल. 

मीन : काहींना हितशत्रुंचा त्रास होण्याची शक्‍यता आहे. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत. 

 

Web Title: Horoscope and Panchang of 15 November 2019
 


संबंधित बातम्या

Saam TV Live