तुमचं या आठवड्याचं भविष्य

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 मार्च 2020
  • या आठावड्यातील तुमच्याबाबतीतल्या चांगल्या वाईट गोष्टी वाचा.
  • या आठवड्या कोणत्या राशीनं कोणती काळजी घ्यावी.
  • कसे राखाल राशीचे संतुलन? 

मेष:

गुरुजनांची कृपा लाभेल. उचित मार्गदर्शनाचा लाभ होईल. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. जिद्द वाढणार आहे.

 वृषभ:

मनोबल वाढेल. उत्साहाने दैनंदिन कामे पूर्ण कराल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 मिथुन:

आरोग्य उत्तम राहणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. इतरांना समजून घ्याल.

 कर्क:

काहींची धार्मिक व आध्यात्मिक प्रगती होईल. दानधर्म कराल. धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. चिकाटी वाढणार आहे.

 सिंह:

आर्थिक लाभ होणार आहेत. व्यवसायातील आर्थिक कामे आज उरकून घ्यावीत. मित्रमैत्रिणींबरोबर सुसंवाद साधाल.

 कन्या:

चिकाटीने कार्यरत राहाल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना अधिकार प्राप्त होईल.

 तूळ:

नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभेल. मनाबेल उत्तम राहील.

 वृश्चिक:

आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. कौटुंबिक जीवनात मतभेद संभवतात. वादविवाद टाळावेत. अतिउत्साहीपणा नको.

 धनु:

वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल. आरोग्याचा त्रास कमी होईल.

 मकर:

अनावश्‍यक कामे करावी लागणार आहेत. वेळ वाया जाईल. मनोबल कमी असणार आहे. हितशत्रूंचा त्रास संभवतो. चिकाटी वाढेल.

 कुंभ:

संततिसौख्य लाभेल. आर्थिक कामास अनुकूलता आहे. तुमचे अंदाज अचूक ठरतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील.

 मीन:

चिकाटी वाढणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी राहणार आहात.

रविवार, मार्च 1, 2020 ते शनिवार, मार्च 7, 2020

मेष:

विवाहप्रस्तावांकडे लक्ष द्या राशीतील शुक्रभ्रमण फाल्गुनोत्सव साजरा करणारं. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींचे ‘होले होले’ होईल! विवाहप्रस्तावांकडे लक्ष द्या. ता. चार व पाच मार्च हे दिवस अत्यंत प्रवाही. जनसंपर्कातून मोठी कामं होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवारची संध्याकाळ शुभदायक. मात्र, शनिवारी तिन्हीसांजेला काळजी घ्या.

 वृषभ:

नोकरीत वरिष्ठांचा मान ठेवा! अष्टमस्थ मंगळभ्रमण रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी दखलपात्र. मित्रांची मनं जपा. नोकरीत वरिष्ठांचा मान ठेवा. बाकी, ता. तीन ते पाच हे दिवस सरकारी कामांचे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार शुभदायक. शनिवारी सूर्योदयी बेरंग होण्याची शक्यता. वस्तूंची नासधूस. स्त्रीवर्गाशी वाद शक्य.

 मिथुन:

बेकायदेशीर व्यवहार नकोत सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. शनी आणि मंगळ यांची फील्डिंग राहील. अजिबात अरेरावी नको. बेकायदेशीर व्यवहार टाळा. बाकी, पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाची गुप्त मदत होईल. सीर्फ आम खाने से मतलब रखो! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस अनेक प्रकरणांतून बेरंगाचे. शब्द जपून वापरा.

 कर्क:

संमोहनापासून दूर राहा हा सप्ताह ग्रहांच्या गुगली गोलंदाजीतून यष्टिबाद करू शकतो. कोणत्याही संमोहनाला बळी पडू नका. राजकीय डावपेचाचे बळी होऊ शकता. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीच्या विरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता. बाकी, पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रभ्रमणाद्वारे मोठे व्यावसायिक लाभ उठवतील. उत्सव-प्रदर्शनांतून लाभ. शनिवार ठेचकाळण्याचा.

 सिंह:

जीवनातील सुरावट साधाल! हा सप्ताह बुद्धिजीवींना अप्रतिमच राहील. आजचा रविवार भाग्यबीजं पेरणारा. व्यवसायातल्या प्रयत्नांना यश येईल. कलाकारांसाठी मोठा सुंदर सप्ताह! मघा नक्षत्राच्या व्यक्ती जीवनातील सुरावट साधतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार विलक्षण सुवार्तांचा. शनिवार सूर्योदयी बेरंग करणारा.

 कन्या:

शेजाऱ्यांशी हुज्जत नको मंगळाची कडक फील्डिंग राहील! रस्त्यावर वावरताना काळजी घ्या. शेजाऱ्यांशी हुज्जत नको. गर्दीच्या ठिकाणी व्हायरसपासून जपा. बाकी, हा सप्ताह व्यावसायिक वसुलीचा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार नोकरीत सुवार्तेचा. पगारवाढ. शनिवारी घरातील वृद्धांशी वाद शक्य. संयम बाळगा.

 तूळ:

तरुणांचं प्रेमप्रकरण फुलेल या सप्ताहाला शुक्रभ्रमणाची एक किनार राहील. तरुणांचं प्रेमप्रकरण फुलेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती कात टाकतील. ता. चार व पाच हे दिवस अतिशय भन्नाट राहतील. मारा विजयी चौकार-षटकार! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाची संधी. मात्र, शनिवार संसर्गजन्य व्हायरसचा. लहान मुलांची काळजी घ्या.

 वृश्चिक:

नोकरीत अनपेक्षित भाग्योदय या सप्ताहाची सुरुवात वैयक्तिक सुवार्तांचीच. सोमवारची संध्याकाळ मोठ्या मौजमजेची. वैवाहिक जीवनात शुभ घटना घडतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीत अनपेक्षित भाग्योदय. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. चार व पाच या दिवशी मौल्यवान वस्तू जपाव्यात. चोरी-नुकसानीची शक्यता. शनिवार मनाविरुद्ध प्रवासाचा.

 धनु:

सरकारी प्रकरण जपून हाताळा शुभ ग्रहांची गुप्त रसद या सप्ताहात पुरवली जाईलच. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांद्वारे चर्चेत राहतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींवर शनी-मंगळाच्या फील्डिंगद्वारे सप्ताहाच्या शेवटी दबाव निर्माण होण्याची शक्यता. एखादं सरकारी प्रकरण सतावू शकतं. जपून हाताळणी करा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना भ्रातृविरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता.

 मकर:

व्यावसायिक भाग्योदयाचा काळ हा सप्ताह मंगळभ्रमणातून धुरळा उडवू शकतो. वाद वाढवू नका. बाकी, आजचा रविवार शुभशकुन घेऊन येईल. श्रवण नक्षत्राच्या कलाकारांना मोठे लाभ होतील. उद्याचा सोमवार व्यावसायिक भाग्यबीजं पेरणारा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट साडेसातीची जाणीव करून देणारा. वैवाहिक जीवनातील आचारसंहिता पाळावी.

 कुंभ:

समजून-उमजून वागा! या सप्ताहात राशीचा नेपच्यून क्रियाशील होऊ लागेल. शनीचा तत्त्वविचार समजून घेऊन वागल्यास जीवनाचा अमृतकुंभ होत असतो हे लक्षात ठेवा! बाकी, पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणातून काही लाभ होतील. ता. चार व पाच हे दिवस अतिशय प्रवाही. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र गुप्त चिंतेचा.

 मीन:

नोकरीत आचारसंहिता पाळा हा सप्ताह दशमस्थ मंगळाच्या दबावातून जाणारा. नोकरीतील आचारसंहिता पाळावी. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. चार व पाच हे दिवस एखाद्या वादात ओढणारे. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार सूर्योदयी सुवार्तेचा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार मानसन्मानाचा. मोठी सरकारी कामं होतील.


संबंधित बातम्या

Saam TV Live