VIDEO | अबब! मोलकरणीला 10 कोटीची नोटीस...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

घरकाम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका मोलकरणीला तब्बल १० कोटी रुपयांचा कर थकविल्याची नोटीस आलीय. एकीकडे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असताना, एवढ्या रकमेचा कर कसा आला? याची चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

घरकाम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका मोलकरणीला तब्बल १० कोटी रुपयांचा कर थकविल्याची नोटीस आलीय. एकीकडे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असताना, एवढ्या रकमेचा कर कसा आला? याची चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

डोंबिवलीच्या रहिवासी असलेल्या तारुलता शाहांसोबत हा धक्कादायक प्रकार घडलाय. ही महिला ज्या कार्यालयात काम करत होती, तिथे कामानिमित्त आलेल्या एका व्यावसायिकाने या महिलेची फसवणूक केली. तिच्या अशिक्षितपाणाचा फायदा घेत या व्यावसायिकानं तिच्या नावाची बनावट कागदपत्रं तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे बनावट कंपनी उघडून कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आले.

शिवाय करही थकवल्याने या महिलेला तब्बल 10 कोटींचा कर थकवल्याची नोटीस आली. मशीद बंदर येथील नरशी नाथा रोडवर राहत असलेल्या पंकज बोरा नावाच्या व्यक्तीने ही फसवणूक केल्याचा आरोप या महिलेने केलाय. 

पतीच्या निधनानंतर तारुलता यांच्यावर चार मुलांची जबाबदारी आहे. अशातच विविध कार्यालयं आणि घरांमध्ये घरकाम करत त्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करताहेत. अशा वेळी घडलेल्या या प्रकारामुळे शाह कुटुंबं हादरून गेलंय. त्यामुऴे फसवणूक करणाऱ्याला लवकरात लवकर बेड्या ठोकून या महिलेला न्याय द्यावा अशी मागणी केली जातेय.

WebTitle : house made received notice for not paying tax of 10 crore rupees


Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live