अमरावती: सीमांडोह परिसरात 50 घरांना भीषण आग; आगीत लाखोंचं नुकसान  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 एप्रिल 2018

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह अतिदुर्गम भागात मुलताई ढाणा परिसरात घरांना आग लागून सुमारे 50 घरं बेचिराख झालीत.  या घटनेत 70 कुटुंब बेघर झाली आहेत. लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान झाल्याचं समजतंय.सुदैवाने आगीत जीवित झालेली. आगीमध्ये बेचिराख झालेल्या बेघर कुटुंबासमोर समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. सीमाडोह हे गाव अतिदुर्गम भागात असल्याने अग्निशमनदल पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे, या आगीमध्ये मोठं नुकसान झालं. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचलेत.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह अतिदुर्गम भागात मुलताई ढाणा परिसरात घरांना आग लागून सुमारे 50 घरं बेचिराख झालीत.  या घटनेत 70 कुटुंब बेघर झाली आहेत. लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान झाल्याचं समजतंय.सुदैवाने आगीत जीवित झालेली. आगीमध्ये बेचिराख झालेल्या बेघर कुटुंबासमोर समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. सीमाडोह हे गाव अतिदुर्गम भागात असल्याने अग्निशमनदल पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे, या आगीमध्ये मोठं नुकसान झालं. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचलेत. सध्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेचे पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले असून तातडीची सानुग्रह राशी दीली जात आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live