भारतातच नव्हे.. जगातील माध्यमांमध्ये मोदींचीच हवा!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 मे 2019

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे परदेश दौरे, परराष्ट्रीय धोरणं, मैत्रीपूर्ण संबंध अशा अनेक गोष्टींची भारतीय माध्यमांसह परदेशातील माध्यमांनीही दखल घेतली होती. भारताच्या लोकसभा निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते, म्हणून आजचे (24 मे) सर्व माध्यमांचे वार्तांकन हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते, त्याचाच घेतलेला हा आढावा...

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे परदेश दौरे, परराष्ट्रीय धोरणं, मैत्रीपूर्ण संबंध अशा अनेक गोष्टींची भारतीय माध्यमांसह परदेशातील माध्यमांनीही दखल घेतली होती. भारताच्या लोकसभा निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते, म्हणून आजचे (24 मे) सर्व माध्यमांचे वार्तांकन हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते, त्याचाच घेतलेला हा आढावा...

'मोदींचे त्रिशतक; सत्तेचा नेशन कप एनडीएच्या हाती' अशा मथळ्याखाली 'सकाळ'ने वार्तांकन केले आहे. सकाळने या वार्तांकनात वैविध्य म्हणून क्रिकेट ही थीम घेतली असून त्याप्रमाणे कार्टून्स व आकर्षक हेडिंग देऊन मोदींच्या विजयाचे वार्तांकन केले आहे.

लोकसत्ताने केवळ एक शब्द 'मोदीच' या मथळ्याखाली मोदींच्या विजयाचे वार्तांकन केले आहे. 

'CHOWKIDAR'S CHAMATKAAR' अशा मथळ्याखाली द टाईम्स ऑफ इंडियाने वार्तांकन केल आहे. टाईम्सनेही कार्टून्सचा वापर करत वेगवेगळ्या नेत्यांना क्रिकेटपटूंच्या वेशात दाखविले आहे.

'Modi 2.024' अशा हटक्या मथळ्याखाली मोदींच्या विजयाचे वार्तांकन केले आहे. मोदी आता 2014 पर्यंत अशा आशयाचे हे वार्तांकन आहे.

'NaMoMENT' असा एकच शब्द लिहून हिंदुस्तान टाईम्सने वार्तांकन केले आहे. तर मुख्य बातमीला मोदींचे पेंटींग वापरले आहे. 

'NAMO 2.0 BIGGER, LOUDER' अशा मथळ्याखाली डिएनए वृत्तपत्राने मोदींच्या विजयाचे वार्तांकन केले आहे. यात 'NAMO 2.0' हा शब्द भगव्या रंगात देण्यात आला आहे.

'INDIA GIVES MODI A HIGH FIVE' अशा मथळ्याखाली 'द हिंदू'ने वार्तांकन केले आहे. आकडेवारी व नकाशाच्या आधारे त्यांनी भाजप विजयाचे वार्तांकन केले आहे.

'फिर एक बार मोदी सरकार' अशा मथळ्याखाली दैनिक जागरणने वार्तांकन केले आहे. यात त्यांनी मोदी, अमित शहा, राहुल गांधी, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी यांचे कार्टून्स वापरले आहे.

'मित्रो! मोदी है तो मुमकिन है' अशा मथळ्याखाली दैनिक भास्करने मोदींचा मोठा फोटो मुख्य बातमीला लावून वार्तांकन केले आहे.

'प्रचंड मोदी' अशा कमी शब्दांचा मथळा असलेल्या अमर उजाला या वृत्तपत्राने मोदींचा भव्य फोटो वापरत वार्तांकन केले आहे. यातील 'प्रचंड' हा शब्द भगव्या रंगात दाखविण्यात आले आहेत.   

'मोदी शहंशाह', 'नमो 2.0 फैसला जनता का' अशा मथळ्याखाली राजस्थान पत्रिका या वृत्तपत्राने वार्तांकन केले आहे. मोदी नमस्कार करत आहेत असा फोटो त्यांनी मुख्य बातमीसाठी वापरला आहे.

आंतरराष्ट्रीय माध्यमांचे वार्तांकन

'Modi Wins Second Term, Routing Gandhi Party' अशा मथळ्याखाली 'द न्यूयॉर्क टाईम्स'ने केल आहे. अमेरिकेशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत व अनेक धोरणांनी हे दोन देश जोडले गेले आहेत.

'Modi wins second term by landslide, pleadges inclusive govt' अशा मथळ्याखाली पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने वार्तांकन केले आहे. पाकिस्तानी माध्यमांचे काल दिवसभर भारतातील निवडणुकींच्या निकालाकडे लक्ष होते. 

'Modi claims victory as BJP poised for sweep' या मथळ्याखाली आपल्या शेजारील देश म्हणजेच चीनमधील चायना डेलीने वार्तांकन केले आहे.   

Web Title: How covers Modi Victory by worldwide media


संबंधित बातम्या

Saam TV Live