VIDEO | एका आवाजाने कशी काय सुरू होते बाईक ?

ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही
मंगळवार, 3 मार्च 2020

मालकाच्या आवाजानेच ही बाईक स्टार्ट होत असल्याने बाईक पाहण्यासाठीच लोक गर्दी करत असतात.. या बाईकला लावलेला पंखा, एटीएम, गाणी ऐकण्यासाठी म्युझिक सिस्टम...हे सगळं मालकाच्या आवाजाने चालतं...

मालकाच्या आवाजानेच ही बाईक स्टार्ट होत असल्याने बाईक पाहण्यासाठीच लोक गर्दी करत असतात.. या बाईकला लावलेला पंखा, एटीएम, गाणी ऐकण्यासाठी म्युझिक सिस्टम...हे सगळं मालकाच्या आवाजाने चालतं...

वय कितीही असो...आपल्या अंगात कला असेल तर माणूस काहीही करू शकतो...हेच सिद्ध करून दाखवलंय उत्तर प्रदेशच्या बरेलीत राहणाऱ्या 80 वर्षीय मोहम्मद सईद अहमद यांनी...मोहम्मद सईद यांनी बनवलेली आगळी वेगळी बाईक सगळ्यांनाच भुरळ घालतेय...बाईकवरून सामान विकणाऱ्या मोहम्मद यांची बाईकशी मैत्री 1965 पासूनची...आपल्या गरजेनुसार त्यांनी बाईकचंही रुपडंच बदललं...सामान विकताना कुणाचे पैसे परत द्यायचे असतील तर बाईकलाच लावलेल्या एटीएममधून पैसे काढून देतात...फक्त किती पैसे हवेत तेवढे ओरडून सांगितले की बाईक एटीएममधून पैसे बाहेर येतात...दररोज लांबचा बाईकनं प्रवास करणाऱ्या मोहम्मद सईद यांना या बाईकमुळे खूप फायदा होतो...यांच्या या बाईकने सगळ्यांनाच प्रेमात पाडलंय...

हॅन्डलजवळ हात नेले की बाईक स्टँडवरून खाली उतरते

बाईक स्टँडवर चढवायची असल्यास बटणाचा वापर केला जातो

बाईक मॉडिफाय केलेली असून, आवाजाने चालते

 

 

बाईकवर बसून आरामही करू शकतो अशी सोयही करण्यात आलीय. वेग किती हवा तेवढा सांगितला की तेवढ्याच वेगाने बाईक चालते. हे सगळं शक्य केलंय बरेलीतील मोहम्मद सईद यांनी. शिक्षण नसतानाही मोहम्मद सईद यांनी ही बाईक तयार केलीय...पण, ही बाईक कशी बनवली ते आजपर्यंत मोहम्मद सईद यांनी कुणालाच सांगितलेलं नाहीये. त्यामुळं आवाजाने सुरू होणाऱ्या बाईकचं रहस्य उलघडलेलं नाही. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live