VIDEO | तुमच्या सॅनिटायझरमध्ये भेसळ तर नाही? वाचा नकली सॅनिटायझर कसं ओळखाल?

साम टीव्ही
सोमवार, 21 सप्टेंबर 2020
  • तुमच्या सॅनिटायझरमध्ये भेसळ तर नाही? 
  • भेसळयुक्त सॅनिटायझर करतायत घात
  • 'साम टीव्ही'चं ऑपरेशन सॅनिटायझर

कोरोनाची भीती मनात बसली तेव्हापासून आपण सगळेच, सॅनिटायझर वापरतोय. सॅनिटायझर कोरोनाचा विषाणू नष्ट करतो, हे खरंय. पण तुमच्याकडे असलेलं सॅनिटायझर जर भेसळ केलेलं असेल, तर या सॅनिटायझरचा विषाणूवर नाही, तर तुमच्यावरच परिणाम होईल,

हातावर सॅनिटायझर लावलं की कोरोनासह अन्य जिवाणू आणि विषाणूही मरतात.  मागच्या काही दिवसांत हे आपल्या सगळ्यांनाच माहित झालंय. आणि म्हणूनच सॅनिटायझर आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण मंडळी आज आम्ही तुम्हाला जी बातमी सांगतोय,  ती बातमी तुमची झोप उडवेल. कदाचित तुमच्याकडे असलेलं सॅनिटायझर हे भेसळयुक्त असेल. आणि हेच सॅनिटायझर तुम्ही तुमच्या हातावर घेऊन कोरोना विषाणून नष्ट झाल्याचं समजाल तर घात होईल. विषाणू शरीरात जाईल आणि मग काय होतं ते आता वेगळं सांगायला नकोय.  म्हणून साम टीव्हीने ऑपरेशन सॅनिटायझर हाती घेतलंय.

नकली सॅनिटायझर कसा ओळखाल?

सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असतं. त्यामुळे हातावर घेतल्यानंतर काही वेळातच उडून जायला सुरवात व्हायला हवी. सॅनिटायझर असली की नकली ओळखण्यासाठी एका टिश्‍यू पेपरवर "बॉलपेन'ने छोटे वर्तुळे तयार करा. त्यावर प्रमाणात हॅन्ड सॅनिटायझर टाका, जर पेनाने तयार केलेल्या वर्तुळातील शाई जास्तच पसरली, तर तुमचं सॅनिटायझर चांगल्या दर्जाचं नाही, असं समजा.

तुमचं सॅनिटायझर जर या परीक्षेत फेल ठरलं, तर ताबडतोब ते बदला. अन्यथा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धोका आहे. 

 भेसळयुक्त सॅनिटायझर घात करेल

  • बनावट सॅनिटायझर वेळेत उडून जात नाही
  • त्यामुळे ते पोटात जाण्याची शक्यता असते 
  • हे सॅनिटायझर पोटात गेल्यास त्रास होऊ शकतो
  • यामुळे लहानग्यांमध्ये गॅस्ट्रोएन्टेरिटिसचा धोका वाढतो
  • ओटीपोटात वेदना, सैल हालचाली, उलट्या ताप, 
  • भूक न लागणे, लघवीचं प्रमाण कमी होणं अशी काही लक्षणं दिसू शकतात
  • या महामारीत अनेकांनी संधी शोधलेय. आणि गोरखधंदा सुरु केलाय. कोरोना काळात जीव वाचवणारं सॅनिटायझरही या गोरखधंद्यातून सुटलेलं नाही. तेव्हा तुम्ही सॅनिटायझर विकत घेताना आणि विकत घेतल्यानंतरही सावध राहा. 


संबंधित बातम्या

Saam TV Live