भारतीयांसाठी ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीसंदर्भातली सर्वात दिलासायक बातमी

साम टीव्ही
मंगळवार, 28 जुलै 2020
  • कोरोना लसीची किंमत किती असणार?
  • वॅक्सिन संघटनेनं केला मोठा खुलासा
  • लसीची कमाल किंमत 2991 रु. असणार
  • गरीब-श्रीमंत देशात किंमत वेगवेगळी ठेवणार

ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोनावरील लस यशस्वी ठरल्याचं समोर आलंय. देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होतेय. कोरोनावर लस निर्मितीसाठी सर्वच देशांकडून प्रयत्न केले जातायंत. त्यातच आता ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या लसीची तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मानवी चाचणीची तयारी पूर्ण करण्यात आलीय. भारतात पाच ठिकाणी ही मानवी चाचणी केली जाणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने जी लस विकसित केली आहे, ती लस सुरक्षित दिसत असून प्रभावी परिणामही आता दिसून आलेत, असा दावा संशोधकांनी केलाय.

एकिकडे ऑक्सफर्ड लसीची चाचणी अंतीम टप्प्यात असताना जगभरात कोरोनाच्या लसीवर ट्रायल सुरु आहेत..त्यातील अनेक ट्रायल आता अंतिम टप्प्यात आल्यात.  त्यामुळं आता कोरोना लसीची किंमत किती असणार हा प्रश्न विचारला जातोय..त्यावर आता ग्लोबल कोरोना वॅक्सिन फंडिंग स्किमतर्फे किंमतीचा अंदाज लावला गेलाय. या संस्थेच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या लसीची कमाल किंमत ही 40 डॉलर म्हणजे 2991 रुपयापेक्षा जास्त नसेल. गरीब आणि श्रीमंत देशांनुसार लसीच्या विक्री किंमतीत फरक पडू शकतो. मात्र ती किंमत 40 डॉलरपेक्षा अधिक नसेल असं या संस्थेनं म्हटलंय.

या सगळ्या घडामोडी सुरू असताना येत्या 2 आठवड्यात कोरोना लस येणार, असा  दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. अमेरिकेत कोरोना लसीची तिसरी चाचणी सुरु झालीय. याविषयी बोलतांना ट्रम्प म्हणाले की,"आम्हाला येत्या दोन आठवड्यात चांगली बातमी ऐकायला मिळेल." आम्ही लवकरच या संदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा करु'. 'ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे कोरोनाशी लढणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. दरम्यान अमेरिकन कंपनी मॉडर्नानं विकसित केलेल्या संभाव्य COVID-19 लसीची तिसरी चाचणी सुरू झालीय. सुमारे 30 हजार स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी केली जातेय. अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात, या लसीचा परिणाम 45 स्वयंसेवकांवर दिसून आलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live