वाचा, कोरोनाची लस तुम्हाला किती रुपयांना मिळणार?

साम टीव्ही
बुधवार, 29 जुलै 2020
  • कोरोनाची लस तुम्हाला किती रुपयांना मिळणार?
  • कोणत्या देशाची लस किती रुपयांना मिळणार?
  • लस तर येणार, पण किती रुपयांना मिळणार?

अनेक देशांमध्ये कोरोनाच्या लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू झालीय. पण ही लस किती रुपयांना मिळणार? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. वाचा सविस्तर...

गेले कित्येक महिने कोरोनाशी संपूर्ण जगाची झुंज सुरूय. सगळ जग कोरोनाची लस शोधण्यात गुंतलंय. अनेक देशांच्या लसींच्या अंतिम टप्प्यांतील मानवी चाचण्या सुरू झाल्यायत. कोरोनावरील लसीची प्रत्येकजण डोळ्यांत प्राण आणून वाट पाहतोय. मात्र त्याचसोबत या लसीची किंमत किती असेल याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झालीय. त्यातच अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने बनवलेली लस सर्वात महाग असेल, असं बोललं जातंय.

मॉडर्नाची लस सर्वात महाग
अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने बनवलेली लस इतर लसींपेक्षा महाग असणार आहे. मॉडर्ना लसीच्या एका कोर्सची किंमत कमीत कमी 3700 रुपये असणार आहे. त्याचसोबत, पुढील कोर्ससाठीच्या लसीची किंमत 4500 रुपयांपर्यंत असमार आहे. मॉडर्ना कंपनीची लस PFIZER आणि BIONTECH पेक्षा 800 रुपयांनी महाग असल्याचं बोललं जातंय.

लहान, मोठा, गरीब-श्रीमंत अशा कुणालाच कोरोनाने सोडलेलं नाहीय. कोरोनाच्या संकटात प्रत्येकजण कातावून गेलाय. त्यात आता लसींच्या अंतिम चाचण्या सुरू झाल्यायत. ही दिलासादायक बातमी असली असली तरी, लसींची किंमत सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात असावी अशी अपेक्षा प्रत्येकजण करतोय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live