केंद्रीय अर्थसंकल्पामुळे तुमच्या खिशाला मोठं भगदाड पडण्याची चिन्हं

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 जुलै 2019

तुम्हाला विकावी लागेल तुमची कार, बाईक?
तुम्हाला किराणा मालाच्या खरेदीला लावावी लागेल कात्री?
भाजीपाला केवळ स्वप्नातच पाहावा लागेल?
तुम्हाला दुधाच्या खरेदीत करावी लागेल घट?

आम्ही तुम्हाला घाबरवत नाही. पण नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे तुमच्या खिशाला मोठं भगदाड पडण्याची चिन्हं निर्माण झालीत. दर महिन्याला मिळणारा पगार तुम्हाला आता वाचवून वाचवून वापरावा लागेल. कारण लवकरच बाजारात खरेदीसाठी जाणं महागडं ठरणाराय. कारण लवकरच महागाईचा भडका उडणाराय. त्याला कारणही तसंच आहे.

बजेटमध्ये पेट्रोल डिझेलवरचा अबकारी कर आणि सेस वाढवलाय. त्यामुळे पेट्रोल 2 रुपये 40 पैसे तर डिझेल 2 रुपये 50 पैशानी महागलंय. भविष्यातल्या भडक्याची ही ठिणगी अर्थसंकल्पानं टाकलीय. ही ठिणगीच येत्या काही दिवसांत भडक्यात बदलून सामान्यांना होरपळून काढणाराय. 

येत्या काळात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 9 रुपयांपर्यंत तर डिझेलच्या दरात 4 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. महागाईचा हा भडका झटक्यात होणार नसून टप्प्याटप्प्यानं होऊ शकतो. 

2002च्या वित्तीय कायद्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सुधारणा झाल्या की, इंधनाचे दर वाढण्याचा मार्ग मोकळा होईल. गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढू लागलेत. इराण आणि अमेरिकेदरम्यान सध्या तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे इराणकडून होणाऱ्या खनिज तेल आयातीवर परिणाम झालाय. त्यामुळेही इंधन महागू शकतं. 

डिझेलचे दरवाढीच्या भडक्याची झळ सामान्यांनाच पोहोचते. कारण डिझेल महागलं वाहतुकीचा खर्च वाढतो आणि वाहतुकीचा हा वाढीव खर्च सामान्यांच्या खिशातून वसूल केला जाईल आणि महागाईचा भडका उडेल. तेव्हा खर्च करताना खिसा पाकीट सांभाळा, असंच आपण म्हणू शकतो.

WebTitle : marathi news how union budget may affect your life 

संबंधित बातम्या

Saam TV Live