वाचा, कोरोनावर लस बनली तर तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार?

साम टीव्ही
रविवार, 26 जुलै 2020
  • कोरोनावर लस बनली तर तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार?
  • किती वर्षांत मिळणार तुम्हाला कोरोनाची लस?
  • कोरोनाच्या लसीवर कुणाचा किती हक्क असणार?

आता बातमी कोरोनाच्या लसीबाबत जगभरात कोरोनाच्या लसीवर अंतिम चाचण्या सुरू आहेत. ही लस यशस्वी झाली तर ती तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार. कशी असते लस पोहोचवण्याची प्रक्रिया पाहूयात...

कोरोनामुळे गरीब-श्रीमंत, लहान-मोठे अशा सर्वत पातळ्यांवरील लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. त्यामुळे जगभरातील संशोधक कोरोनाची लस शोधण्यासाठी गुंतलेयत. भारतासह जगातील अनेक कंपन्यांनी कोरोनावरच्या लसीची अंतीम चाचणी सुरू केलीय. पण या चाचण्या यशस्वी झाल्या तर ही लस आपल्यापर्यंत कशी पोहोचणार, याबाबत सगळ्यांनाच कुतूहल आहे. आणि प्रत्येकजण डोळ्यात प्राण आणून कोरोनाच्या लसीची वाट पाहतोय.

कशी पोहोचणार कोरोनाची लस तुमच्यापर्यंत?

WHOच्या एका संचालकाच्या मतानुसार कोरोनावर लस सापडली तर 2021 सालापर्यंत 2 अब्ज डोस पोहचवण्याचं लक्ष्य ठेवलंय. त्याचसोबत या लसीचे 50 टक्के डोस आधी गरीब देशांमध्ये पाठवले जातील. पण त्यासाठी लसीच्या वितरणाची काटेकोर व्यवस्था संबंधित देशांना उभारावी लागेल. अर्थात सर्वात आधी कोरोनाग्रस्तांसाठी ही लस वापरली जाईल. त्यानंतर आरोग्यसेवक, लहान मुलं आणि वृद्धांना प्राधान्य दिलं जाईल.

हे झालं लसीच्या वितरणाचं, पण, या लसीची निर्मिती जी कंपनी करेल त्या कंपनीला लसीच्या डिझाईनचे हक्क 14 वर्षांसाठी असतील. त्याचसोबत  त्या कंपनीला लसीचं पेटंट 20 वर्षांसाठी दिलं जाईल. अर्थात, लसीच्या निर्मितीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे लसीची निर्मिती लवकरात लवकर होवो अशीच प्रार्थना प्रत्येकजण करतोय.


संबंधित बातम्या

Saam TV Live