हृतिकच्या बहिणीचा कंगणाला सपोर्ट ?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जून 2019

कंगना आणि हृतिक यांच्यातील वाद काही केल्या संपेना. प्रत्येकवेळी या वादाला वेगळं वळण लाभतं. आता या वादात हृतिकची बहीण सुनैनानं उडी घेतली आहे. माझा पाठिंबा हा नेहमीच कंगनाला असेन असं ट्विट करत सुनैनानं सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. यापूर्वी कंगनानं एका मुलाखतीत हृतिकची बहीण आपली चांगली मैत्रिण असल्याचा दावा केला होता. कंगनाच्या म्हणण्याला सुनैनानं आपल्या ट्विटमधून एकप्रकारे दुजोरा दिला आहे. 

'मी कंगनाच्या मागे उभी आहे' असं ट्विट सुनैनानं केलं त्याचबरोबर 'आणि मी अक्षरश: नरकात राहत आहे.  या सर्व गोष्टींना मी कंटाळले आहे' असंही ती आपल्या ट्विटमध्ये म्हणाली. 'माझे माझ्या कुटुंबीयांसोबत काही वाद आहेत', असंही हृतिकची बहीण 'पिंक व्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. माझे कुटुंबीयांसोबत काही मतभेद आहेत जे मला सांगायचे नाही. मी आणि माझे पालक एकाच घरात राहतो. मात्र मला राहण्यासाठी वेगळा मजला देण्यात आला आहे. माझा  येण्या- जाण्याचा मार्गही  वेगळा आहे. ही दुर्दैवाची बाब आहे पण माझे कुटुंबीय मला पाठिंबा देत नाही' असं सुनैना या मुलाखतीत म्हणाली. 

web title: Hrithik's sister support kangana?

संबंधित बातम्या

Saam TV Live