बारावीच्या निकालाचा मार्ग मोकळा; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या बहिष्कार आंदोलनाला स्थगिती

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 एप्रिल 2018

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आपल्या बहिष्कार आंदोलनाला स्थगिती दिलीय. त्यामुळे बारावीच्या निकालाच मार्ग अखेर मोकळा झालाय..शिक्षणमंत्र्यांनी मागण्या मान्य न केल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आक्रमक झाला होता. त्यामुळे, त्यांनी उत्तरपत्रिका राज्य शिक्षण मंडळाकडे जमा न करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, बारावीच्या ८० लाखांहून अधिक उत्तरपत्रिका शिक्षकांकडेच पडून होत्या. आता मात्र शिक्षणमंत्र्यांच्या आवाहानला प्रतिसाद देत आपल्या आंदोलनाला त्यांनी स्थगिती दिलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live