हुक्का पार्लरना राज्यात रात्री 1.30 पर्यंत परवानगी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

राज्य सरकारच्या कामगार विभागाने काढलेल्या एका अधिसूचनेनुसार हुक्का पार्लरना राज्यात रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गृह विभागात खळबळ उडाली आहे. ही परवानगी कोणत्या आधारे दिली, याची विचारणा गृह विभागाने केली आहे. कमला मिलमधील "मोजोस बिस्ट्रो' आणि "वन अबव्ह' या पबना हुक्‍का पार्लरमुळे आग लागल्याचे उघडकीस आले. या पार्श्वभूमीवर राज्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर बंदी घालण्यासाठी कायदाही करण्यात येणार अाहे.

राज्य सरकारच्या कामगार विभागाने काढलेल्या एका अधिसूचनेनुसार हुक्का पार्लरना राज्यात रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गृह विभागात खळबळ उडाली आहे. ही परवानगी कोणत्या आधारे दिली, याची विचारणा गृह विभागाने केली आहे. कमला मिलमधील "मोजोस बिस्ट्रो' आणि "वन अबव्ह' या पबना हुक्‍का पार्लरमुळे आग लागल्याचे उघडकीस आले. या पार्श्वभूमीवर राज्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर बंदी घालण्यासाठी कायदाही करण्यात येणार अाहे. कमला मिलमधील आग हुक्क्यामुळे लागल्याचा अहवाल आल्यानंतर लगेचच मुंबई महापालिकेने या अधिसूचनेचा आधार घेऊन त्याच्या आड लपण्याचा प्रयत्न सुरू केलाय. याविषयी गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कमला मिलमधील आगप्रकरणी दोषी असणारे या अधिसूचनेचा तांत्रिकदृष्ट्या बचाव करण्यासाठी वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.


संबंधित बातम्या

Saam TV Live