शिवाजीनगरच्या पाटील झोपडपट्टीतील 50 झोपड्यांना आग; फायरब्रिगेडच्या ३० गाड्या घटनास्थळी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

पुण्यातल्या शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट झोपडपट्टीला आग लागलीय. पाटील झोपडपट्टीतल्या गल्ली नंबर तीनमध्ये ही आग लागल्याचं सांगण्यात येतंय. आगीत आतापर्यंत पन्नास झोपड्या जळून खाक झाल्यात. झोपडपट्टीतल्या सिलिंडर स्फोटामुळे आग आणखीन भडकलीय. या परिसरातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू झालंय. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय. फायरब्रिगेडच्या ३० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आग लागलेल्या भागातले रस्ते चिंचोळे असल्यानं या भागात अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचण्यातही अडचण होतेय.

पुण्यातल्या शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट झोपडपट्टीला आग लागलीय. पाटील झोपडपट्टीतल्या गल्ली नंबर तीनमध्ये ही आग लागल्याचं सांगण्यात येतंय. आगीत आतापर्यंत पन्नास झोपड्या जळून खाक झाल्यात. झोपडपट्टीतल्या सिलिंडर स्फोटामुळे आग आणखीन भडकलीय. या परिसरातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू झालंय. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय. फायरब्रिगेडच्या ३० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आग लागलेल्या भागातले रस्ते चिंचोळे असल्यानं या भागात अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचण्यातही अडचण होतेय. आग लागलेल्या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केल्यानं बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत.

WebTitle : marathi news humongous fire at patil estate shivajinagar pune 


संबंधित बातम्या

Saam TV Live