पद नसतानाही पक्षातला मान कायम - छगन भुजबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

नाशिक : ''कार्यकर्त्यांनी पदापेक्षा समाजाचे प्रश्‍न, समाजाच्या अडचणींसाठी अधिक जोमाने झटले पाहिजे. स्वतःचे प्रमोशन झाले तर इतरांना पदे दिली पाहिजेत. असे केले तर खऱ्या अर्थाने मान सन्मान मिळतो. आज माझ्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कोणतेही पद नाही. मात्र पक्षात मान सन्मान मिळतोच. तो कधीच कमी झालेला नाही," असे प्रतिपादनमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले. 

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारीणीची आढावा बैठक बुधवारी मुंबईत झाली. मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत त्यांनी सध्याचे कार्यकर्ते, पदाधिकारी संघटनेतील पदे सोडाला तयार नसतात. यावर विचार केला पाहिजे. काही धोरण ठरवले पाहिजे असे मत मांडले. ते म्हणाले, "राजकारण असो वा समाजकारण तालुक्‍याचे पदज असलेल्याचे प्रमोशन झाले व तो जिल्हा अध्यक्ष होतो. जिल्हा अध्यक्ष विभागीय स्तरावर पदाधिकारी होतो. विभागीय पदाधिकारी राज्याचा पदाधिकारी होतो. मात्र हे सर्व होतांना तो आपले पद सोडत नाही. ते आपल्याकडेच ठेवतो. हे योग्य नाही. यावर संघटनेत एक धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे. प्रमोशन झाल्यावर पदाधिकाऱ्याने आपले जुने पद दुसऱ्यांना दिले पाहिजे. काम करणाऱ्यांना बरोबर घेतले पाहिजे. आज माझ्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोणतेही पद नाही. प्रदेश अध्यक्ष, विरोधी पक्षनेता अथछवा अन्य कोणतेही पद नाही. त्याने काय होते. कारण पक्षात मान, सन्मान मिळतोच. त्याचे कारण आपण पदापेक्षा संघटना, समाजाच्या अडचणी, प्रश्‍नांना महत्व दिले पाहिजे. त्यासाठी झोकून देऊन काम केले पाहिजे."

या बैठकीस आमदार सिध्दार्थ कुशवाहा, प्रा. हरी नरके, आमदार रामराव वडकुते, तुकाराम अभंग, जयवंत जाधव, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ,  यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

web title: I do not have a position but I get honor in the party

संबंधित बातम्या

Saam TV Live