भारताचा ढाण्या वाघ विंग कमांडर अभिनंदन मायभूमीत परतला

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 मार्च 2019

नवी दिल्ली : अभिनंदन... अभिनंदन..., भारत माता की जय... जय हिंद. अभिनंदन वेलकम... या जयघोषात भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं वाघा सीमेद्वारे मायभूमीत जोरदार स्वागत करण्यात आले. वीरपुत्राच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज होता.

भारताच्या ढाण्या वाघाच्या स्वागतासाठी नागरिकांनी वाघा सीमेवर मोठी गर्दी केली होती. मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. अभिनंदन यांचे आई-वडील दुपारीच वीरपुत्राच्या स्वागतासाठी वाघा सीमेवर दाखल झाले होते. शिवाय, हवाई दलाच्या अधिकारी दाखल झाले होते. अभिनंदन यांचे आगमन होणार असल्याने नेहमी होणारा बीटिंग द रिट्रीट हा सोहळाही रद्द करण्यात आला. तिरंगा फडकावून, नृत्य करून नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यान, अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी (ता. 27) पाकिस्तानच्या संसदेत केली होती. कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर त्यांना इस्लामाबादवरून लारोरला आणण्यात आले. लोहारवरून दुपारी वाघा सीमेवरून ते मायभूमीत दाखल झाले. यावेळी भारतीय अधिकारी ग्रुप कॅप्टन जेडी कुरियनही त्यांच्यासोबत होते.

संबंधित बातम्या

Saam TV Live