आयसीसीच्या मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये 'द वॉल'चा सन्मान

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 जुलै 2018

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये 'द वॉल' म्हणजेच राहुल द्रविडचा सन्मान करण्यात आलाय. क्रिकेट जगतातील प्रतिष्ठांच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये राहुल द्रविडचा समावेश करण्यात आलाय. मानाच्या यादीत समावेश होणारा राहुल द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू ठरलाय. 

डब्लिन इथं आयोजित कार्यक्रमात राहुल द्रविड याच्या नावाची घोषणा करण्यात आली. आयसीसीतर्फे याहीर करण्यात आलेल्या यंदाच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि इंग्लडची माजी महिला क्रिकेटपटू क्लेयर टेलर यांचाही समावेश करण्यात आलाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live