#WWT20 : विश्वविजयासाठी भारताची मोहीम आजपासून

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

गयाना : गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठल्याने भारतीय महिला क्रिकेट संघांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. याच अपेक्षापूर्तीसाठी वेस्ट इंडिजमध्ये आजपासून सुरु होणाऱ्या ट्वेंटी20 क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ प्रयत्नशील असेल. 

गयाना : गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठल्याने भारतीय महिला क्रिकेट संघांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. याच अपेक्षापूर्तीसाठी वेस्ट इंडिजमध्ये आजपासून सुरु होणाऱ्या ट्वेंटी20 क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ प्रयत्नशील असेल. 

आज भारताची सलामीची लढत बलाढ्य न्यूझीलंड संघाशी आहे. भारताची ट्वेंटी20 संघाची कर्णधार हरमनप्रित कौर आणि नवीन प्रशिक्षक रमेश पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ नव्या जोमाने विश्वकरंडकात खेळणार आहे. तसेच संघात युवा खेळाडूंचा सहभाग वाढल्याने संघात जोश निर्माण झाला आहे. भारतीय संघातील सहा खेळाडू पहिल्यांदाच विश्वकरंडक खेळत आहेत. भारतीय संघाला एकदाही ट्वेंटी20 विश्वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. 2009 आणि 2010 मध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. 

ट्वेंटी20 विश्वकरंडकात एकूण 10 संघांचा सहभाग असून त्यांची दोन गटात विभागणी केली आहे. दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि श्रीलंका या संघांचा अ गटात समावेश करण्यात आलेला आहे. आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि भारत या संघांचा ब गटात समावेश करण्यात आलेला आहे. 

भारतीय संघ सध्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे. भारताने श्रीलंकेला त्यांच्या देशात पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघालाही मायदेशात पराभूत केले होते. विश्वकरंडकाच्या सराव सामन्यातही भारताने वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दोन्ही संघावर विजय मिळविला असल्याने सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे.

WebTitle : marathi news ICC women's world cup t20 to start form today  


संबंधित बातम्या

Saam TV Live