जानेवारीत बुलेट ट्रेनच्या वेगानं धावणार ट्रेन १८

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

बुलेट ट्रेनची चर्चा सुरू असताना बुलेट ट्रेनची अनुभूती देणारी देशी एक्स्प्रेस भारतातच तयार होतेय. या नव्या एक्स्प्रेसचं नाव आहे ट्रेन-१८. 

युरोपियन गाड्यांच्या धर्तीवर ट्रेन-१८ गाडी चेन्नईच्या आयसीएफ फॅक्ट्रीत तयार होतेय. जानेवारीत ही ट्रेन दिल्ली-भोपाळ मार्गावर चालवली जाणार आहे. ट्रेन-१८ला लोकोमोटीव्ह इंजिन नसणार आहे. लोकलप्रमाणं दोन्ही बाजुला इंटीग्रेटेड इंजिन असणार आहे.

ट्रेनमध्ये अव्वल दर्जाच्या सुविधा देण्यात आल्यात. अवघ्या १८ महिन्यात देशी हायस्पिड ट्रेन तयार झालीय. मेक इन इंडियाचं हे मोठं यश मानलं जातंय.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचं स्वागत की आणि वादच जास्त झाले. पण ही ट्रेन १८ तिच्या वेग आणि तिच्या सुविधांमुळे भारतीय रेल्वेसाठी मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live