राज ठाकरे आज सांयकाळी इचलकरंजी येथे धडाडणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 एप्रिल 2019

इचलकरंजी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज सांयकाळी येथे धडाडणार आहे. सभेसाठी मोठी गर्दी होण्याची शक्‍यता असल्यांने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्किंगासाठी चार जागा निश्‍चीत केल्या आहेत. 

इचलकरंजी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज सांयकाळी येथे धडाडणार आहे. सभेसाठी मोठी गर्दी होण्याची शक्‍यता असल्यांने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्किंगासाठी चार जागा निश्‍चीत केल्या आहेत. 

येथील यशोलक्ष्मी मंगल कार्यालय नजीकच्या मैदानात सायंकाळी 6 वाजता ही सभेला सुरुवात होणार आहे. प्रदिर्घ कालावधीनंतर राज ठाकरे यांची सभा होणार असल्यांने सभेमध्ये मोठी उत्सुकता आहे. यापूर्वी झालेल्या सभामध्ये भाजप सरकारवर कडाडून टिका केली आहे. विशेष करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शहा यांच्यावर त्यांनी आपल्या सभांमध्ये हल्लाबोल केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला ते कोणत्या शब्दात उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.

संयोजकांकडून सभेची जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यासाठी चार ठिकाणी वाहन तळ केले आहेत. यामध्ये मॉडर्न हायस्कूल मैदान, शिवमंदीर, जैन बोर्डींग परिसर आणि सरकार मळा (कबनूर) येथे वाहनांच्या पार्किंगची सोय केली आहे. सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. यामध्ये 11 पोलीस अधिकारी, 50 कर्मचारी व 150 गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. 

भव्य व्यापपीठ 
सभेसाठी मनसेच्या स्टाईलप्रमाणे भव्य व्यासपिठाची उभारणी करण्यात आली आहे. सभेसाठी विस्तीर्ण मैदान आहे. या मैदानात नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सभा यशस्वी करण्यासाठी मनसेचे जिल्ह्यातील पदाधिकारी सभास्थळ परिसरात तळ ठोकून आहेत.

राजू शेट्टी यांचे ट्‌विट
कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या ट्‌विटर अकाऊंटवरुन राज ठाकरे यांच्या सभेबाबत ट्‌विट केले आहे. इचलकरंजीत इतिहास घडणार असल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे. राज ठाकरे हे शेट्टी यांचा प्रचार करणार आहेत. हे शेट्टी यांनी केलेल्या ट्‌विटरवरुन स्पष्ट झाले आहे.

Web Title: Raj Thackeray Today in Ichalkaranji


संबंधित बातम्या

Saam TV Live