यापुढं ATM मध्ये पैसे नसल्यास बँकेला भरावा लागणार दंड

माधव सावरगावे
सोमवार, 17 जून 2019

ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यावर अनेकदा एटीएम बाहेर रक्कम नसल्याचा बोर्ड दिसतो. गरजेच्यावेळी एटीएममध्ये पैसे नसल्याने अनेकदा आपली गोची होते. अशावेळी निराश होऊन तुम्ही दुसरा एटीएम शोधता. पण, यापुढं एखाद्या एटीएम बाहेर असा बोर्ड दिसला तर तुम्ही संबंधित बँकेविरोधात आरबीआयकडे तक्रात करु शकता. आरबीआयच्या नव्या नियमानुसार त्या बँकाला दंड होऊ शकतो.

एटीएममधील रक्कम पूर्णपणे रिकामी झाल्यास तीन तासांमध्ये पुन्हा भरण्याचे निर्देश आरबीआयने दिलेत. रक्कम न भरल्यास त्या बँकेवर विभागनिहाय दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

दंडाची रक्कम प्रत्येक विभागाप्रमाणे वेगवेगळी असेल. आरबीआयचे हे पाऊल ग्राहकांसाठी नक्कीच फायद्याचं आहे. असं असलं तरी टीएममध्ये पैसे नसल्यास ग्राहकांनी तक्रार कशी आणि कुठे करायची याबद्दलची स्पष्टता नाही. छोटी शहरं आणि ग्रामीण भागातील एटीएम पैशांविना अनेक दिवस बंद पडलेली असतात. मात्र, यापुढं असं चित्र दिसणार नाही.

Web Title : marathi news if atm is out of cash banks will have to pay fine rbi

संबंधित बातम्या

Saam TV Live