डॉक्टरांनो, सावधान! लॉकडाऊन काळात दवाखाने बंद ठेवलेत तर, परवानेच रद्द होतील...

साम टीव्ही
शनिवार, 28 मार्च 2020

 रुग्णाला वैद्यकीय सेवा न देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, अशी तंबी प्रशासनातर्फे केलीय. ज्या डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठोवले, त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशाराच डॉक्टरांनी दिलीय.

सध्या कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असतानाच आता डॉक्टरांवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे सगळ्या डॉक्टरांनी योग्य ती काळजी घेणं आणि आपली सेवा देणं महत्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी आपले खासगी दवाखाने सुरुच ठेवावे असं आवाहन करण्यात आलंय. याबाबत काही कठोर नियमही प्रशासनानं घेतलेत.

महाराष्ट्र मोठ्या संकटात! दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी...

दवाखाने बंद ठेवून नागरिकांची गैरसोय करणाऱ्या डॉक्टरांचे परवाने रद्द होणार आहेत. अशा डॉक्टरांवर महापालिका प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिलेत..तसंच झोपडपट्टी परिसरातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांना तुरुंगात टाकावे, असे आदेशही त्यांनी दिले.अनेक डॉक्टरांनी कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने त्यांचे खासगी दवाखाने बंद ठेवलेत. त्यामुळे सामान्य, गरीब नागरिकांची मोठी गैरसोय होतेय. याबाबत पालिकेकडे तक्रारी आल्या आहेत.अशा डॉक्टरांना पालिकेकडून नोटीस दिली जाणार आहे. मात्र नोटीस दिल्यानंतरही जे डॉक्टर दवाखाने सुरु करणार नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात यावे, असे आदेश जाधव यांनी प्रशासनाला दिलेत.

 

इटलीत कोरोनाचा कहर, कोरोनामुळे 9 हजाराहून अधिक जणांचा मृत्यू

कोरोना विषाणू हा तीव्र संसर्गजन्य आहे. त्याचा फैलाव नियंत्रित करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. काही डॉक्टर कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने वैद्यकीय सेवा देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ते बाह्यरुग्ण विभाग आणि रुग्णालये बंद ठेवत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्याबद्दलचे आवाहन या पत्रातून डॉ. म्हैसेकर यांनी केले. 

यासह वैद्यकीय सेवा न देणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी भारतीय वैद्यक परिषद (आयएमसी) तसेच, आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणास कळविण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. 

आपल्या जिल्ह्यातील सर्व दवाखाने, त्यातील बाह्यरुग्ण विभाग, रुग्णालये नियमित सुरू रहातील, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी पत्रात ठळकपणे नमूद केले आहे. 

त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची सेवा पूर्णपणे नागरिकांना पुरवावी हे माहत्वाचं ठरेल. 

Web Title - Marathi news  If the clinic is closed during the lockdown, then doctors licenses will be revoked ..


संबंधित बातम्या

Saam TV Live