हल्ली सरकारवर टीका करणारा देशद्रोही ठरतो, शबाना आझमींचा सरकारवर निशाना

हल्ली सरकारवर टीका करणारा देशद्रोही ठरतो, शबाना आझमींचा सरकारवर निशाना

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आजकाल जर एखाद्य़ाने सरकारवर टीका केली तर त्याला लगेच देशद्रोही ठरवले जाते, असा आरोप त्यांनी केला. अशा गोष्टींना घाबरण्याची काहीच गरज नाही. त्यांच्या प्रमाणपत्राचीही आपल्याला आवश्यकता नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले, मध्य प्रदेशमधील इंदूर येथे त्या बोलत होत्या. 

देशाच्या भल्यासाठी आपल्या कमतरता दाखवून देणे आवश्यक आहे. जर आपण असे केले नाही तर आपली स्थिती कशी सुधारेल, असा सवाल त्यांनी यावेळी केला. पण सध्या परिस्थिती अशी आहे की जर तुम्ही सरकारवर टीका केली तर लगेच तुम्हाला देशविरोधी जाहीर केले जाते. पण याला घाबरण्याची गरज नाही. कोणालाही त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही.

'जय श्रीराम' बंगाली संस्कृतीचा हिस्सा नाहीः अमर्त्य सेन
आपण गंगा-जमुनेच्या संस्कृतीत वाढलेलो आहोत. अशा स्थितीपूर्वी आपण गुडघे टेकवू नयेत. भारत एक सुंदर देश आहे. लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न या देशासाठी चांगला नाही, असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हेही उपस्थितीत होते.

Web Title: if we criticise govt were branded as anti nationals says Shabana Azmi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com