VIDEO | रोज अंडी खाताय तर ही बातमी पाहाच! काय घडलंय पाहा.

साम टीव्ही
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020
  • संडे हो या मंडे, दररोज खाऊ नका अंडे
  • दररोज अंडी खाल्ल्यास नव्या आजाराला निमंत्रण 
  • शास्त्रज्ञांनी दिला धोक्याचा इशारा 

कोरोनाकाळात सृदृढ आरोग्यासाठी तुम्ही जर दररोज अंडी खात असाल तर जरा काळजी घ्या. दररोजच्या आहारात अंड्यांचा समावेश केल्यानं त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागलेत. ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी याबाबतचा एक धक्कादायक अहवाल दिलाय. पाहूयात एक रिपोर्ट 

कोरोना संकटामुळे अंडी खाण्याकडे लोकांचा कल वाढलाय. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येक जण अंड्यांवर ताव मारू लागलाय. त्यामुळे चार रूपयांना मिळणारं अंडही आता सात रूपयांवर जाऊन पोहचलंय. शरीरासाठी अंडी हा पौष्टिक आहार असला हीच अंडी एका नव्या आजाराला निमंत्रण देऊ शकतात. दररोज एक अंड खाल्ल्यामुळे मधुमेह टाइप-2 चा धोका वाढत असल्याचा इशारा संशोधकांनी दिलाय. ऑस्ट्रेलियातल्या संशोधकांनी हा इशारा दिलाय. त्यांनी 8545 चिनी युवकांवर संशोधन केलं. त्यात अंडी खाल्ल्यामुळे अनेकांची शुगर वाढल्याचं दिसून आलं.

वर्ष 1991 पासून 2020 दरम्यान अंडी खाणाऱ्या चिनी नागरिकांची संख्या दुप्पट झालीय. 1991 मध्ये 16 ग्रॅम अंडी खाल्ली जात होती. सध्याच्या घडीला चीनमध्ये हेच प्रमाण 40 ग्रॅमच्या पुढे गेलंय. दररोज 35 ते 38 ग्रॅमपेक्षा जास्त अंडी सेवन केल्यास मधुमेहाचा धोका होऊ शकतो असा दावा संशोधकांनी केलाय. 

विशेष म्हणजे याआधीच्या संशोधनात दररोज अंड खाल्ल्यामुळे मधुमेह होत नसल्याचा दावा करण्यात आला होता. आता नवीन संशोधनात याउलट दावा करण्यात आलाय. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम वाढलाय. त्यामुळे तुम्ही आहारात नियमीत अंडी घेत असाल तर एकदा तरी आहारतज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्याल.  

 


संबंधित बातम्या

Saam TV Live