महिलांचं Whatsapp Status पाहाल तर जेलमध्ये जाल...

माधव सावरगावे
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी एक सावधगिरीचा इशारा. महिलांचं व्हॉट्सऍप किंवा फेसबुक स्टेटस सतत पाहात असाल तर तुम्हाला जेलवारी घडू शकते. कशी वाचा...

 

सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी एक सावधगिरीचा इशारा. महिलांचं व्हॉट्सऍप किंवा फेसबुक स्टेटस सतत पाहात असाल तर तुम्हाला जेलवारी घडू शकते. कशी वाचा...

 

तुम्हाला महिलांची व्हॉट्सऍप, फेसबुक स्टेट्स पाहायला आवडतात? पण जरा सांभाळून. एखाद्या महिलेचं व्हॉट्सऍप किंवा फेसबुक स्टेट्स सतत पाहात असाल तर जेलची हवा खावी लागेल. तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होईल.
एखाद्या महिलेनं किंवा मुलीनं तिचं व्हॉट्सऍप स्टेटस बदललं की तातडीनं ते पाहायची तुमची खोड असेल तर ती तुम्ही सोडून देणंच उत्तम. कारण एखाद्या महिलेचं तातडीनं स्टेटस पाहणं म्हणजे तिच्यावर चोरून नजर ठेवण्यासारखं आहे. हा भारतीय दंड विधान 354 ड नुसार गंभीर गुन्हा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेवर चोरून नजर ठेवली तर पहिल्या गुन्ह्यासाठी 3 वर्षे जेल आणि दंड तर दुसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास 5 वर्षे कारावास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.

महिला सहसा अशा गुन्ह्यांच्या तक्रारी करण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे गुन्हेगारांचं धाडस वाढतं..त्यामुळे महिलांनी या नराधमांना धडा शिकवण्यासाठी पुढे आल्यास या गुन्हेगारांना जरब तर बसेलच पण भविष्यातले गुन्हेही टळतील, हे नक्की.

Web Title - If you look at Whatsapp Status of Women you will go to jail


संबंधित बातम्या

Saam TV Live