तुमच्या कारला फास्टॅग लावला नसेल तर खिसा खाली करायला तयार राहा!

तुमच्या कारला फास्टॅग लावला नसेल तर खिसा खाली करायला तयार राहा!

तुमच्याकडे जर फोर व्हिलर असेल, तर आधी तुमच्या गाडीला फास्टॅग लावून घ्या... नाहीतर खिसा खाली करुन घ्यायला तयार राहा... फास्टॅग काय आहे? तो कसा आणि कुठे लावून मिळेल? हे माहीत नसेल तर हा रिपोर्ट पाहा.... 

 केंद्र सरकारकडून 'वन नेशन वन फास्टॅग'ची अंमलबजावणी लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे फास्टॅग लावून घेण्यासाठी आता तुमच्याकडे अवघे काही दिवस उरलेत. अन्यथा तुमच्या नव्या वर्षाची सुरुवात भुर्डंदाने होईल. 

फॉस्टॅग आहे तरी काय?

  • फास्टॅग हा रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅगसारखा आहे
  • गाडीच्या पुढच्या काचेवर हा टॅग लावण्यात येतो
  • वेळोवेळी हा फास्टॅग रिचार्ज करावा लागतो
  • फास्टॅगमुळे गाडीला टोल नाक्यावर थांबण्याची गरज पडत नाही
  • हा फास्टॅग स्कॅन होऊन टोलचे पैसे कापले जातात

 आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा फास्टॅग मिळतो कुठे? 

फास्टॅग कसा बसवाल?

  • राज्यातील आरटीओ कार्यालयांत, पेट्रोल पंपावरही फास्टॅग मिळेल
  • शॉपिंग साइटवरून ऑनलाइनही खरेदी करता येईल
  • अधिक माहितीसाठी MYFASTag Appलाही भेट द्या
  • या ऍपवरच फास्टॅग रिचार्ज करता येईल 

तेव्हा लवकरात लवकर यापैकी एखादा पर्याय निवडा. आणि तुमच्या कारला फास्टॅग लावून घ्या. नाहीतर फास्टॅगची अंमलबजावणी सुरु झाली आणि तुमची गाडी फास्टॅगच्या मार्गिकेत सापडली तर दुप्पट टोल भरावा लागेल. यात दिलासा इतकाच आहे. की 15 डिसेंबरपर्यंत दिलेली मुदत आता जानेवारी महिन्यापर्यंत वाढवून मिळालेय. तेव्हा लवकरात लवकर कारला फास्टॅग लावून घ्या...

Web Title -   If your car is not fastagged, be prepared to pay money

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com