आयआयटी बॉम्बेत ज्युनिअर विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 जून 2018

आयआयटी बॉम्बे; देशातील नावाजलेली शिक्षण संस्था. याचं संस्थेच्या फेसबुकवरील कन्फेशन पेजवरुन काही विद्यार्थ्यांनी आपल्यावर झालेल्या त्रासाला वाचा फोडली आहे.  आयआयटी बॉम्बेमध्ये शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप होतोय. महत्त्वाची बाब म्हणजे काही तरुणांनीही आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा केला आहे. 

आरोपी विद्यार्थी हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकतो. याचंविद्यार्थ्याची 'मूड इंडिगो' या फेस्टिव्हलमध्ये मेंटॉर म्हणूनही नियुक्ती केली गेली होती. दरम्यान, आरोपीने 15 ज्युनिअर विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी गेल्या सहा महिन्यात आल्याचं समजतंय. मात्र, कोणतेही ठोस पुरावे नसल्याने या विद्यार्थ्याचं निलंबन झालं नसल्याचं आयआयटी बॉम्बे व्यवस्थापनातील सूत्रांनी सांगितलंय 

संबंधित बातम्या

Saam TV Live