कारमध्ये एसी लावून झोपताय? ही सवय तत्काळ सोडा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

बऱ्याच जणांना कारमध्ये एसी चालू ठेवून झोपायची सवय असते. त्यातल्या त्यात ड्रायव्हर्सची संख्या मोठी आहे. एखाद्याला ड्रॉप केल्यावर गाडीत एसी लावून ताणून द्यायची. पण हीच सवय तुमच्या जीवावर बेतू शकते. कारण विक्रोळी पार्कसाईटजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये चालकाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालीय. 

गाडीचा एसी चालू ठेवून झोपी ते झोपी गेले होते. यातच त्यांचा गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. सुरेश डबरे असं मृत चालकाचं नाव आहे. ते विक्रोळी पार्कसाईट विभागातच रहात होते. दोन दिवसांपासून ते घरी गेले नव्हते. पण या कारमधून काही नागरिकांना दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं तेव्हा ही बाब उघड झाली. 

तुम्हालाही गाडीत एसी लावून झोपायची सवय असेल तर ती तात्काळ बदला, नाहीतर हीच सवय तुमच्या जीवावर बेतू शकते.

WebTitle : marathi news ill effects of sleeping in car with AC on 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live