मीच बिहारचा दुसरा लालूप्रसाद यादव - तेज प्रताप यादव

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 मे 2019

जहानाबाद (बिहार): मीच बिहारचा दुसरा लालूप्रसाद यादव आहे, असे लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांनी म्हटले आहे. लालूप्रसाद यादव यांची मुले तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरु आहे.

तेजस्वी यादव यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे आपले अनेक नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. भावाचे नाव न घेता एका प्रचारसभेदरम्यान टीका करताना तेजप्रताप यादव म्हणाले, 'बिहारचा मीच दुसरा लालूप्रसाद यादव असून कुटुंबाचा खरा वारसदार आहे. लालूप्रसाद यादव खूप उत्साही व्यक्तिमत्व आहे. ते दिवसाला 10 ते 12 कार्यक्रमांना उपस्थिती लावत असत. पण आता दोन कार्यक्रमांना उपस्थिती लावली तरी नेते आजारी पडतात. माझ्यात लालू प्रसाद यादव यांचे रक्त आहे. ते माझे आदर्श आणि गुरु आहेत.'

दरम्यानस लालूप्रसाद यादव सध्या कारागृहामध्ये असून, तेजस्वी यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून तेज प्रताप यादव वारंवार तेजस्वी यादव यांच्यावर टीका करत आहे. गेल्या महिन्यात दोघे भाऊ वाढदिवसानिमित्त एकत्र आले होते. यावेळी दोघांनीही कॅमेऱ्यासमोर एकमेकांची गळाभेट घेतली होती. पण हा फक्त दिखावा असल्याचे स्पष्ट जाणवत होते.

संबंधित बातम्या

Saam TV Live