राज्यातील रुग्णालये, सोनोग्राफी सेंटर बंद, रुग्णसेवेला मोठा फटका ?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 जून 2019

कोलकात्यातील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनकडून आज देशव्यापी संपाची हाक देण्यात आलीय. त्यामुळे राज्यातील रुग्णालये, सोनोग्राफी सेंटर बंद राहणार आहेत. या संपाचा आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोलकात्यातील सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीविरोधात मेडिकल असोसिएशनने संपाचं हत्यार उपसलंय. सरकारी रुग्णालयांतील डॉक्टर संपकाळात काळ्या फिती लावून काम करणार आहेत.

मात्र, खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर या संपात सहभागी होणार असल्यानं रुग्णसेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील हजारो डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र आता डॉक्टर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचंय

संबंधित बातम्या

Saam TV Live