मणिपुरी चित्रपट निर्माते अरिबम श्‍याम शर्मांकडून पद्मश्री सन्मान परत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

इम्फाळ - प्रस्तावित नागरिकत्व सुधारणा विधेयकास विरोध करण्यासाठी आज आघाडीचे मणिपुरी चित्रपट निर्माते अरिबम श्‍याम शर्मा (वय 83) यांनी पद्मश्री सन्मान शासनाला परत करण्याची घोषणा केली आहे. त्यांना 2006 मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 

दरम्यान, मणिपूरमधील विविध राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला असून, या अनुषंगाने अकरा प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची दिल्लीत भेट घेत आपला विरोध दर्शविला. 

मणिपुरी चित्रपटांना जागतिक पातळीवर नेणारे आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी असलेल्या शर्मा यांची एक संवेदनशील चित्रपट निर्माता म्हणून ओळख आहे. त्यांनी आज या प्रस्तावित विधेयकाला विरोध करत पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. मणिपूरचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते एन. बिरेन सिंह यांनीही या विधेयकाला विरोध केला असून आमचे राज्य या विधेयकाच्या कक्षेतून वगळले जावे अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे. हे विधेयक मंजूर झाले तर राज्यामध्ये परप्रांतीयांचा पूर येईल अशी भीती स्थानिकांमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अनुषंगाने मेघालयचे मुख्यमंत्री आणि "नॅशनल पीपल्स पार्टी'चे अध्यक्ष कॉनराड के. संगमा यांच्या नेतृत्वाखालील विविध पक्षांच्या अकरा सदस्यीय शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्या चिंता राजनाथ यांच्यासमोर मांडल्या. दरम्यान, हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून, ते आता राज्यसभेतही मंजूर होण्याची शक्‍यता आहे. 

नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास आसाममधील परिस्थिती आणखीन चिघळेल आणि याला केवळ केंद्रातील मोदी सरकार कारणीभूत असेल. 
- प्रफुल्लकुमार महंता, माजी मुख्यमंत्री, आसाम 

Web Title: Manipuri film maker Arimbam Shyam Sharma returns the Padma Shri

संबंधित बातम्या

Saam TV Live