इम्फाळमध्ये मुसळधार; त्रिपुरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 जून 2018

मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आलाय. इथल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान जवानांकडून पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येतंय..आतापर्यंत जवळपास हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आलंय.

त्रिपुरामध्ये जनजीवन विस्कळीत

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्रिपुरामध्ये जनजीवन विस्कळीत झालंय..इथल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरलंय..रस्ते तसंच रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झालाय..तर काही ट्रेन्सही रद्द करण्यात आल्यात.

भूस्खलनामुळे 9 जण मृत

मुसळधार पावसामुळे केरळमधल्या कोझीकोडेमध्ये भूस्खलन झालंय. कोझिकोडेमधल्या कट्टीप्पारामध्ये झालेल्या भूस्खलनामुळे मृत पावलेल्यांची संख्या 9 वर गेलीये अद्यापही याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live