घराच्या मालकी संदर्भात ठाकरे सरकार घेणार हा महत्वपूर्ण निर्णय

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 25 डिसेंबर 2019

घराच्या मालकी हक्कासंबंधी ठाकरे सरकार एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. काय आहे हा निर्णय? पाहुयात या सविस्तर पंचनाम्यातून...

घराच्या मालकी हक्कासंबंधी ठाकरे सरकार एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. काय आहे हा निर्णय? पाहुयात या सविस्तर पंचनाम्यातून...

ठाकरे सरकार तुमच्या घराच्या खरेदी-विक्रीवरची स्टॅम्प ड्युटी माफ करणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. तुम्हाला रक्ताच्या नातेवाईकाला घर किंवा फ्लॅट विकायचा असेल किंवा हस्तांतर करायचा असेल तर त्यावर संपूर्ण स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलाय. राज्य शासनानं घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता अवघ्या 500 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर स्थावर मालमत्ता हस्तांतरित करता येणार आहे. 

सध्या नातेवाईकांना घर, फ्लॅट हस्तांतर करताना मालमत्तेच्या सरकारी किंमतीवर 5 टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. पण आता राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे रक्ताच्या नातेवाईकाला घर किंवा जागा हस्तांतरित करणं अधिक सुकर होणार आहे.

Web Title - Important disision about your home stamp duty 


संबंधित बातम्या

Saam TV Live