शाळा, महालयातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

साम टीव्ही
बुधवार, 27 मे 2020
  • 'शाळा-कॉलेज सुरु करण्यास परवानगी नाही'
  • केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्टीकरण
  • 'शाळा सुरु करण्याचे आदेशाच्या फक्त अफवाच'
  • 'सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नका'

देशभरातील शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था सुरु कऱण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

सर्व राज्यांना शाळा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून यासंबंधी ट्विट करण्यात आलं आहे. “केंद्रीय गृहमंत्रालयाकडून असा कोणताही निर्णय़ घेण्यात आलेला नाही. देशभराती सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम आहेत,” अशी माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे.
 

दहावीच्या विद्यार्थ्यांचे गूण असे देणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द झाल्याने आता भुगोलाला सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी साम टीव्हीला ही माहिती दिलीय.

रद्द करण्यात आलेल्या भूगोल या विषयाचे गुणांकन कसे होणार याबाबत पालकांमध्ये संभ्रम होता. म्हणून त्यावर निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर करीत सर्व पेपरमध्ये आलेल्या गुणाच्या सरासरीच्या आधारावर भूगोलचे गुणांकन करावे अशी शिफारस केलीय.

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live