दिवाळीपूर्वी अयोध्याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होणार ?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

अनेक दशकं भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या राम मंदिराचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे. कदाचित दिवाळीपूर्वीच राम मंदिर युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण होऊ शकते. कारण सुप्रीम कोर्टानं अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची 'डेडलाइन' निश्चित केलीय. १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण व्हायला हवी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितलंय. त्यामुळे नोव्हेंबरच्या मध्यात राम मंदिराचा निर्णय येऊ शकतो.

सरन्यायाधीश गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीआधी या प्रकरणी निकाल सुनावला जाण्याची शक्यता आहे. गरज लागल्यास एक तास अतिरिक्त तसंच शनिवारीही सुनावणी करण्याची तयारीही न्यायालयानं दर्शवलीय. त्यामुळं देशातील राजकीय आणि सामाजिक दृष्टीन संवेदनशील असलेलं अयोध्या रामजन्मभूमीप्रकरण निकाली लागण्याची शक्यता आहे.

WebTitle : marathi news important statement of Justice ranjan gogoi on ram mandir    

संबंधित बातम्या

Saam TV Live