'इम्रान खान' पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

इस्लामाबाद : 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ'चे  अध्यक्ष इम्रान खान यांनी आज (शनिवार) पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या 22 व्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 

इम्रान खान यांच्या पक्षाने पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे इम्रान खान यांची पंतप्रधानपदी निवड होईल, असा दावा 'पीटीआय'कडून करण्यात येत होता. अखेर आज त्यांचा शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी माजी क्रिकेटपट्टू आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी उपस्थिती लावली.

पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान यांच्या 'पीटीआय'ला सर्वाधिक बहुमत मिळाले होते. पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष असद कैसर यांनी काल (शुक्रवार) इम्रान खान यांना पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकल्याचे जाहीर केले. त्यानंतर आज त्यांचा शपथविधी पार पडला. 

WebTitle : marathi news imran khan took oath as twenty second pm of pakisatan 

संबंधित बातम्या

Saam TV Live