वाचाळवीरांनी तोंडाला कुलूप लावले तरच सरकार टिकेल - इम्तियाज जलिल यांचा राऊतांना टोला

सरकारनामा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

औरंगाबाद : राज्यात सध्या सुरू असलेले वाद, आरोप-प्रत्यारोप म्हणजे बिनपैशाचा तमाशा झाला आहे. तीन पक्षांचे सरकार राज्यात आलेले आहे, हे सरकार जर टिकवायचे असेल तर या पक्षाच्या नेत्यांनी वायफळ बडबड न करता तोंडाला कुलूप लावणे अत्यंत गरजेचे आहे, असा सल्ला "एमआयएम' चे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीतील वाचाळवीर नेत्यांना दिला आहे. 

औरंगाबाद : राज्यात सध्या सुरू असलेले वाद, आरोप-प्रत्यारोप म्हणजे बिनपैशाचा तमाशा झाला आहे. तीन पक्षांचे सरकार राज्यात आलेले आहे, हे सरकार जर टिकवायचे असेल तर या पक्षाच्या नेत्यांनी वायफळ बडबड न करता तोंडाला कुलूप लावणे अत्यंत गरजेचे आहे, असा सल्ला "एमआयएम' चे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीतील वाचाळवीर नेत्यांना दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारे भाजपच्या नेत्याने प्रसिध्द केलेले पुस्तक, त्यावरून उदयनराजे भोसले यांनी शिवसेना व भाजपच्या नेत्यांवर केलेली टिका, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उदयनराजे यांना छत्रपतींचे वंशज असल्याचा जो पुरावा मागितला आणि इंदिरा गांधी यांचे करीम लाला यांच्याशी जोडलेला संबंध यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

या वादावर एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना आपले मत मांडले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हाच मी या तिन्ही पक्षातील माझ्या मित्रांना एक सल्ला दिला होता. तुमचे सरकार जर टिकवायचे असेल तर प्रसार माध्यमांसमोर बोलण्याचा मोह टाळा, वायफळ बडबड करू नका, अन्यथा हेच तुमचे सरकार कोसळण्याचे कारण ठरेल. परंतु या मित्रांनी माझा सल्ला फारसा मनावर घेतलेला दिसत नाही. 

राज्या सध्या सुरू असलेला वाद आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती पाहता या सरकारला कामापेक्षा अशा वादांमध्येच जास्त रस असल्याचे दिसते. मी सध्या इंदूर येथे केंद्राच्या शहरी विकास समितीच्या दौऱ्यावर आहे. अनेक विकासकामांच्या चर्चा या बैठकांमधून होत आहे. त्यामुळे राज्यात काय चाललेय हे पाहण्यासाठी मला वेळच मिळाला नाही, आपण टीव्ही देखील पाहिला नसल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. 

छत्रपतींशी तुलना म्हणजे वेडेपणा.. 
छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदी यांची भाजपच्या जयभगवान गोयल या लेखकाने केलेली तुलना म्हणजे शुध्द वेडेपणा आहे. शिवाजी महाराजांएवढी उंची कुणालाही गाठता येणार नाही. त्यामुळे गोयल यांनी हा आगाऊपणा का केला ? कुणाच्या सांगण्यावरून केला का ? हे ही तपासले पाहिजे. माझ्या दृष्टीने हे वेडेपणाचे लक्षण असल्याची टिकाही इम्तियाज जलील यांनी केली. 


संबंधित बातम्या

Saam TV Live