पुण्यातील कोंढव्यात भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू ; मुंबईमध्ये 24 तासांत घर किंवा भिंत कोसळण्याच्या 14 घटना

पुण्यातील कोंढव्यात भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू ; मुंबईमध्ये 24 तासांत घर किंवा भिंत कोसळण्याच्या 14 घटना

पुणे : अवघ्या महाराष्ट्रासाठी आजचा (शनिवार) दिवस उजाडला, तो निराशाजनक बातम्यांनीच. काल मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील कोंढवा येथे भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागला, तोच मुंबईतूनही अशाच स्वरूपाची आणखी एक घटना घडली. दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये एका पेट्रोल पंपाच्या ऑफिसला आग लागली. मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये घर किंवा भिंत कोसळण्याच्या 14 घटना घडल्या आहेत. 

नेमकं काय काय झालंय महाराष्ट्रात आतापर्यंत? 
पुणे : ज्या भिंतीच्या आधारे बांधकाम मजुरांचे संसार सुरु होते, त्याच भिंतीने घात केला. कोंढवा येथील एका बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्यांवर मध्यरात्री भिंत कोसळली. त्यात 15 जणांचे मृत्यू झाले. यात चार लहान मुलांचाही समावेश होता. 

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे फनटाईम सिनेमाजवळ महापालिकेने नव्यानेच बनविलेला जॉगिंग ट्रॅक आज सकाळी आठच्या सुमारास कोसळला. त्यात जीवितहानी झालेली नाही. सकाळची वेळ असल्याने परिसरात वर्दळ नव्हती. या कॅनॉललगत जॉगिंग ट्रॅक आणि ओपन जिम तयार करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने भराव घातला आहे. पावसामुळे ही भिंत खचली. 

पुणे : सिंहगड रस्त्यावरील पादचारी मार्ग मागील वर्षी खचला होता. नंतर तो दुरुस्तही केला होता. काल तो पुन्हा खचला.

पिंपरी-चिंचवड : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळली. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटात ही घटना घडली. या घटनेचा मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. 

मुंबई : कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे रात्री 12 च्या सुमारास टाटा नगर येथील गोवंडी भीम सेवा संघ चाळीतील एक भिंत कोसळून दोघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तत्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मुंबई : पूर्व अंधेरीमधील मरोळच्या भवानी नगर येथे एक भिंत कोसळली. या भिंतीखाली उभ्या असलेल्या चारचाकी गाड्या त्या ढिगाऱ्यात दबल्या गेल्या. त्याचा सीसीटीव्हीचा व्हिडिओही प्रसिद्ध झाला आहे. 

मुंबई : कुर्ल्यात स्टेशन परिसरामध्ये संसार हॉटेलसमोर असलेली इमारत कोसळली. 'शकीना मंजिल' ही इमारत अतिधोकादायक होती. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याशिवाय, उल्हासनगरमध्येही एक भिंत कोसळली. बचावपथकाने तातडीने धाव घेत जेसीबीच्या साह्याने ढिगारा हटविण्याचे काम सुरू केले. 

मुंबई : सायन कोळीवाडा येथे आज सकाळी एक झाड कोसळले. त्या झाडाला लागून असलेला वीजेचा खांबही कोसळला. त्यात काही वाहनांचे नुकसान झाले; पण जीवितहानी झालेली नाही. 

मुंबई : विरारमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मचा काही भाग कोसळला. यामध्ये कुणीही जखमी झालेले नाही. 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com