त्या हत्तीणीची दुर्दैवी कहाणी...माणुसकीला काळीमा फासणारी घटना

साम टीव्ही
गुरुवार, 4 जून 2020
  • गर्भवती हत्तीणीची निर्घृण हत्या
  • भुकेनं व्याकुळ होती हत्तीण
  • माणुसकीला काळीमा फासणारी घटना

कोरोना व्हासरसनं माणसावर मोठं संकट आलंय. तरी माणसातील निर्घृणता संपलेली नाही. याचीच प्रचिती देणारा प्रसंग केरळ मधील मलाप्पूरम इथं घडलाय. भुकेनं व्याकुळ असलेली गर्भवती हत्तीण माणसांच्या वस्तीजवळ आली. तिला खायला द्यायचं सोडून निर्दयी लोकांनी तिचा जीवच घेतला.  

 कोरोनाच्या संकटातही माणूस किती निर्दयीपणे वागू शकतो याचा प्रत्यय ही दृश्य पाहिल्यानंतर येईल. आठवड्याभराच्या संघर्षानंतर या हत्तीणीनं आपला जीव सोडलाय. काहीतरी खायला मिळेल या आशेनं ही हत्तीण माणसांच्या वस्तीत आली. पण स्थानिकांनी खायला तर सोडा तिच्या सोबत जे काही केलं ते कुणी शुत्रूसोबतसुद्धा करणार नाही.  स्थानिकांनी तिला अननसातून फटाके खायला दिली.

अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीणीनं अननस म्हणून ते फळ खाल्लं. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले. ही हृदयद्रावक घटना केरळमध्ये घडलीय. हत्तींना पळवण्यासाठी फटाक्यांचा वापर, ही काही नवीन गोष्ट नाही. पण या घटनेनं पुन्हा एकदा आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे का?

याचा विचार नक्की करण्यास भाग पाडलंय. अन्नाच्या शोधात मुके जीव माणसांच्या वस्तीत येतायेत. तशीच ही हत्तीणही तिथं आली. तिनं कुणालाही त्रासही दिला नाही. मग इतकं निर्दयी होण्याचं कारण काय? हे कृत्य पाहिल्यानंतर माणसापेक्षा जनावरं बरी असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live