देशाचं लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवणार? वाचा कसा असेल कालावधी...

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 8 एप्रिल 2020

सरकार लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांनी साम टिव्हीला दिलीय.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात १४ एप्रिलपर्यत २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र देशातली कोरोनाग्रस्तांचा वाढती संख्या पाहता केंद्र सरकार देशभरातील लॉकडाऊन वाढवण्याच्या विचारात आहे. जाणकारांनी दिलेल्या सल्ल्यानंतर सरकार लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांनी साम टिव्हीला दिलीय. अनेक राज्य सरकारांनी केलेल्या विनंतीनंतर आणि कोरोनामुळे जगभरात झालेल्या मृत्यूंचा आकडा पाहता केंद्र सरकार लॉकडाऊन वाढवण्याची दाट शक्यता आहे..यासंदर्भातील निर्णयही लवकरच घेतला जाणार आहे.

मुंबई MMRDAसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, नागपूर या भागातील लॉकडाऊन. चौदा एप्रिलनंतर वाढवलं जाणार आहे... राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनीच साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. मुंबई, पुण्यासह काही शहरांमधील कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. धारावी झोपडपट्टी, वरळी या दाट लोकवस्ती असलेल्या भागातही रुग्ण सतत आढळतेय. कोरोना रुग्णांची संख्या जोपर्यंत पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत लॉकडाऊन काढणे अडचणीचे होऊ शकते. असं मत बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केलंय.  राज्यात जवळपास 10 ते 11 असे जिल्हे आहेत त्या ठिकाणी सुदैवाने एकही रुग्ण आढळलेला नाही.. त्यामुळे 14 तारखेनंतर असे जिल्हे अंतर्गत व्यवहारासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र त्या जिल्ह्यांना जिल्हाबंदी लागू असेल, त्यांना अन्य जिल्ह्यात जाता येणार नाही असेही महसूलमंत्री थोरात यांनी स्पष्ट केले.

Web Title - Increase country lockdown by 15 days? Read how the period will be ...


  


संबंधित बातम्या

Saam TV Live