ऐन सणासुदीत वाढणाऱ्या इंधन दरामुळे सर्वसामान्यांवर संक्रांत

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे. आज पेट्रोल 18 पैसे तर डिझेल 31 पैशांनी महागले आहे. 

मुंबईत आज  प्रतिलिटर पेट्रोलचा दर 88.12 रुपये असून डिझेलसाठी वाहनधारकांना 78.82 रुपये मोजावे लागत आहेत. इंधन दरवाढीचा भडका आणि महागाईच्या चटक्यांमुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची, ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 

गेल्या आठवड्यात मोदी सरकारने केलेल्या दर कपातीनंतर इंधनाच्या दरात रोजच वाढ होताना दिसत आहे. गेल्या 8 दिवसात पेट्रोल 1 रुपया 15 पैशांनी भडकले. तर डिझेलच्या दरात 2 रुपये 8 पैशांची वाढ झाली आहे. ऐन सणासुदीत वाढणाऱ्या इंधन दरामुळे सर्वसामान्यांवर संक्रांत ओढवल्याचंच चित्र पाहायला मिळतंय.

WebTitle : marathi news increasing fuel prices in india and collapsing budget of comma man  

संबंधित बातम्या

Saam TV Live