#IndependenceDay : आज महाराष्ट्रातील 41 पोलिस अधिकाऱ्यांचा गौरव

#IndependenceDay : आज महाराष्ट्रातील 41 पोलिस अधिकाऱ्यांचा गौरव

स्वातंत्र्य दिन : नवी दिल्ली - पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशभरातील 946 पोलिस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त गौरविण्यात आले आहे. तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक, 117 जणांना पोलिस शौर्यपदक जाहीर झाले आहे; तर अतिविशिष्ट सेवेसाठी 89 जणांना राष्ट्रपती पोलिस पदक, तर 677 जणांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस पदक मिळणार आहे. यात महाराष्ट्रातील 41 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, 180 कर्मचारी शौर्य पुरस्कारविजेते आहेत. जम्मू-काश्‍मीरमध्ये शौर्य बजाविणाऱ्या 114 पोलिस कर्मचाऱ्यांचा, माओवादी हिंसाचारग्रस्त भागात प्रभावी कारवाई करणाऱ्या 62, तर ईशान्य भारतातील कामगिरीबद्दल चार पोलिस अधिकाऱ्यांना गौरविले जाणार आहे. शौर्यपदक मिळविणाऱ्यांमध्ये 72 कर्मचारी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे, 61 जम्मू-काश्‍मीर पोलिस दलाचे, 23 ओडिशाचे, नऊ छत्तीसगडचे, तर इतर उर्वरित राज्यांचे आहेत.

महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापूरच्या "एसडीपीओ' करवीर विभागाचे उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील, मुंबईतील साकीनाका विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मिलिंद भिकाजी खेटले, पुण्यातील "एसआरपीएफ'चे असिस्टंट कमांडंट हरिश्‍चंद्र गोपाळ काळे, कोल्हापूरच्या जिल्हा विशेष शाखेचे सहायक उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना अतिविशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.

उत्कृष्ट सेवेचे पोलिस पदक मिळविणारे महाराष्ट्रातील कर्मचारी
1) सुरेशकुमार सावळेराम मेंगाडे (पोलिस अधीक्षक, मानव हक्क संरक्षण, ठाणे)
2) विक्रम नंदकुमार देशमाने (पोलिस उपायुक्त, झोन 5, मुंबई)
3) दिलीप पोपटराव बोरस्ते (पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे)
4) नेताजी शेकुंबर भोपळे (सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा नागपाडा, मुंबई)
5) मुकुंद नामदेव हातोटे (सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे)
6) किरण विष्णू पाटील, (सहायक पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई)
7) अविनाश प्रल्हाद धर्माधिकारी (सहायक पोलिस आयुक्त, डोंगरी, मुंबई)
8) श्रीमती गोपिका शेषदास जहागीरदार (पोलिस उपअधीक्षक, पीसीडब्ल्यूजी, महासंचालक कार्यालय, मुंबई)
9) मंदार वसंत धर्माधिकारी (उपअधीक्षक डहाणू विभाग, पालघर)
10) राजेंद्र लक्ष्मणराव कदम (पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे, पुणे)
11) सय्यद शौकत अली साबीर अली (पोलिस निरीक्षक, पेठ बीड पोलिस ठाणे, बीड)
12) सतीश दिगंबर गायकवाड (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळंबोली पोलिस ठाणे, नवी मुंबई)
13) बालाजी रघुनाथ सोनटक्के (पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस ठाणे, चिंचवड)
14) रवींद्र गणपत बाबर (सहायक पोलिस निरीक्षक, सीआयडी, पुणे)
15) अब्दुल रऊफ गनी शेख (सहायक पोलिस निरीक्षक, साकीनाका पोलिस ठाणे, मुंबई)
16) रमेश दौलतराव खंडागळे (राखीव पोलिस उपनिरीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर)
17) प्रकाश भिवा कदम (पोलिस उपनिरीक्षक, पायधुनी पोलिस ठाणे, मुंबई)
18) किशोर अमृत यादव (पोलिस उपनिरीक्षक, चिंचवड वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड)
19) राजेंद्र नारायण पोळ (पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, पुणे)
20) नानासाहेब विठ्ठल मासल (सशस्त्र पोलिस उपनिरीक्षक, एसआरपीएफ, सोलापूर)
21) रघुनाथ मंगलू भारसात (पोलिस उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, नाशिक ग्रामीण)
22) केशव शेषराव टेकाडे (सहायक उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, अमरावती)
23) रामराव दासू राठोड (सहायक उपनिरीक्षक, जालना)
24) दत्तात्रय तुकाराम उगलमुगले (सहायक उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण)
25) मनोहर लक्ष्मण चिंताल्लू (सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे)
26) कचरू नामदेव चव्हाण (सहायक उपनिरीक्षक, पीसीआर, अमरावती)
27) दत्तात्रय गोरखनाथ जगताप (सहायक उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण)
28) अशोक सोमाजी तिडके (सहायक उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नागपूर शहर)
29) विश्‍वास श्‍यामराव ठाकरे (सहायक उपनिरीक्षक, तहसील पोलिस ठाणे, नागपूर)
30) सुनील गणपतराव हरणखेडे (सहायक उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, यवतमाळ)
31) गोरख मानसिंह चव्हाण (सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, औरंगाबाद शहर)
32) अविनाश सुधीर मराठे (सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर)
33) खामराव रामराव वानखेडे (सहायक उपनिरीक्षक, मांडवी पोलिस ठाणे, नांदेड)
34) नितीन रामराव शिवलकर (सहायक उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, नागपूर शहर)
35) प्रभाकर धोंडू पवार (हेडकॉन्स्टेबल, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)
36) अंकुश सोमा राठोड (हेडकॉन्स्टेबल, दशतवादविरोधी विभाग, जालना)
37) बाळू मच्छिंद्र भोई (हेडकॉन्स्टेबल, वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण)
38) श्रीरंग नारायण सावर्डे (हेडकॉन्स्टेबल, लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे, मुंबई)
39) अविनाश गोविंदराव सातपुते (हेडकॉन्स्टेबल, पोलिस मुख्यालय, नांदेड)
40) मकसूद अहमदखान पठाण (हेडकॉन्स्टेबल, पुराना पोलिस स्टेशन, परभणी)
41) गणेश तुकाराम गोरेगावकर (हेडकॉन्स्टेबल, गुन्हे शाखा, मुंबई)

Web Title: Independence Day 41 police officer honor Gallantry medal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com