#AsianGames2018 : रोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटात भारताला सुवर्णपदक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

रोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटातून भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदक काबीज केले. त्यामुळे इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे.

या संघात नाशिकच्या चांदवड तालुक्‍यातील व सध्या लष्कारात असलेल्या रॉईंगपटू दत्तू भोकनळचा समावेश आहे. त्याच्यासमवेत ऑलिंम्पिकपटू सवरण सिंग आणि ओम प्रकाश, सुकमीत सिंग या संघाने शर्यत 6:17:13 अशी वेळ नोंदवत सूवर्णपदकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे भारताचे पाचवे सुवर्णपदक आहे. 

WebTitle : marathi news india bags gold in rowing competition at asian games 2018

संबंधित बातम्या

Saam TV Live