ऍडलेडच्या दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 जानेवारी 2019

टीम इंडियानं ऍडलेडच्या दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवलाय. भारताच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो कर्णधार विराट कोहली. कोहलीनं त्याच्या कारकीर्दीतलं 39वं शतक झळकावून भारताचा विजय साकारला.  

भारतानं विजयासाठीचं 299 धावांचं लक्ष्य चार चेंडू राखत पूर्ण केलं. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं शॉन मार्शच्या दमदार शतकाच्या जोरावर एडलेड वन डेत भारतासमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं. 50 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियानं 9 बाद 298 धावा केल्या.

डावखुऱ्या मार्शने आपल्या वन डे कारकीर्दीतलं सातवं शतक साजरं केलं. त्यानं 123 चेंडूत 131 धावांची दमदार खेळी उभारली.  भारताकडून भुवनेश्वर कुमारने चार, मोहम्मद शमीने तीन तर रवींद्र जाडेजाने एक विकेट घेतली. 

WebTitle : marathi news India beat Australia  in second one day match in Adelaide

संबंधित बातम्या

Saam TV Live