भारतात कोरोनामुळे 559 जणांचा मृत्यू, काल एका दिवसांत 1500 रुग्ण वाढले...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 एप्रिल 2020

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये आज एकाच दिवसांतील सर्वाधिक म्हणजे १५५३ ची वाढ झाली. मृतांच्या संख्येतही ३६ इतकी वाढ होण्याचा कोरोना महामारीच्या काळातील आजचा पहिलाच दिवस ठरला. बहुतांशी म्हणजे ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नसतानाही ते कोरोनाग्रस्त झाल्याचे लक्षात आले असून हे अतिशय चिंताजनक असल्याचे केंद्रीय आरोग्य यंत्रणेने नमूद केले.

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातली कोरोनाबाधितांची संख्या 17 हजार 656 वर पोहोचली असून आतापर्यंत 559 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर सध्या 14 हजार 255 रुग्णांवर उपचार सुरू असून 2842 लोकं पूर्णपणे बरे झालेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय.  महाराष्ट्रात सर्वाधिक 4 हजार 666 रुग्ण आढळले आहेत तर 232 जणांचा मृत्यू झालाय. मध्य प्रदेशात 74, गुजरातमध्ये 67, दिल्लीत 45, तर तेलंगणात 21 जण दगावले आहेत. उत्तर प्रदेशात 17 तर तामिळनाडूत 15 आणि आंध्र प्रदेशात 20 जणांचा मृत्यू झालाय.

देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या साडे सतरा हजारांच्या जवळ गेली असून मृतांची संख्याही साडे पाचशेपर्यंत पोहोचली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात सर्वाधिक ४,४८३ रुग्ण आहेत. देशाच्या विविध भागांमध्ये जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले आणि त्यांच्या कामात अडथळे आणण्याच्या प्रकारांचा निषेध करताना, हे हल्ले रोखण्यासाठी २३ एप्रिलला काळा दिवस पाळण्याचे भारतीय वैद्यकीय संघटनेने जाहीर केले आहे. त्याआधी २२ एप्रिलला रात्री नऊला या हल्ल्यांच्या निषेधार्थ ‘व्हाईट अलर्ट टू द नेशन’ या मोहिमेअंतर्गत देशभरात ठिकठिकाणी मेणबत्ती मोर्चे काढण्यात येतील, असेही ‘आयएमएनए’ने स्पष्ट केले. या काळात जीव धोक्यात घालून कोरोनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनीही कामावर येण्याआधीच स्वतःची सुरक्षा तपासणी करून घेणे आवश्यक आहे, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. 

कोरोनाची बाह्य लक्षणे दिसत नसलेलेही कोरोनाग्रस्त झाल्याचे प्रमाण मोठे आहे. हे चिंताजनक लक्षण असल्याचे सरकारने मान्य केले. दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण साडेआठ टक्के आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानीत कोरोना चाचण्या वाढवल्या, त्यानंतर ७३६ पैकी १८६ कोरोनाग्रस्तांमध्ये काहीही लक्षणे दिसलेली नाहीत असे सांगण्यात आले. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव आगरवाल यांनी सांगितले की, देशाच्या ५९ जिल्ह्यांमध्ये गेल्या चौदा दिवसात एकही रुग्ण आढळलेला नाही. गोवा संपूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. त्याच वेळी १८ राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत जात असताना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही सव्वातीन दिवसांवरून साडेसात दिवसांपर्यंत वाढलेला आहे. या महामारीवर अद्याप कोणतेही औषध शोधण्यात आलेले नाही व सोशल डिस्टन्सिंग हे एकच औषध यावर प्रभावी आहे असेही आरोग्य मंत्रालयाने अधोरेखीत केले. 

मंत्रालये अंशत: सुरू
विविध मंत्रालयांमध्ये त्याचप्रमाणे लोकसभा आणि राज्यसभा सचिवालय यांमधील आजपासून कामावर रुजू झाले. सर्व मंत्रालयांमध्ये अंशतः कामकाज सुरू झाले आहे आणि संयुक्त सचिव तसेच त्या वरील पदांवरील अधिकारी कामावर येण्यास सुरवात झाली आहे. हे बहुतांश अधिकारी सरकारी गाड्यांमधून कार्यालयांमध्ये येत असतात. संसदेसह विविध मंत्रालयाच्याही प्रवेशद्वारांवर अधिकाऱ्यांच्या गाड्यांची सनीटायझर्सद्वारे फवारणी तसेच कार्यालयात प्रवेश करण्याआधी प्रत्येकाची तपासणी करण्याचे पथ्य काटेकोरपणे पाळले गेले. 


संबंधित बातम्या

Saam TV Live